बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एजबस्टन मैदानावर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी (2 आॅगस्ट) पहिल्या डावात शतकी खेळी केली आहे. याबरोबरच त्याने अनेक खास विश्वविक्रमही रचले.
१४९ धावांची खेळी करताना विराटने २२५ चेंडूंचा सामना केला होता. त्यात २२ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे.
विराटने ज्या २२५ चेंडूंचा सामना केला त्यात ७४ चेंडू तो एकट्या जेम्स अॅडरसन या जगातील दिग्गज वेगवान गोलंदाजाचे खेळला. ७४ पैकी ६४ चेंडूवर विराटने एकही धाव घेतली नाही.
अॅंडरसनच्या १० चेंडूवर विराटने १८ धावा केल्या.
अॅंडरसनने तब्बल २२ षटके गोलंदाजी केली. त्यातील तब्बल १२.२ षटके एकटा विराट खेळला आहे. ३६ वर्षीय अॅंडरसनने विराटला बाद करण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केले. अतिशय उच्च दर्जाच्या गोलंदाजीचे त्याने काल प्रदर्शन केले.
विराट कोहललीला कसोटीत अॅंडरसनेपेक्षा जास्त वेळा कोणत्याही गोलंदाजाने बाद केलेले नाही. ५ सामन्यात तब्बल ४ वेळा त्याने ४ वर्षांपुर्वी कोहलीला बाद केले होते.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–दिग्गज ब्रायन लाराच्या विश्वविक्रमाला विराट कोहलीकडून धक्का
–दिग्गजांकडून मिळवली विराटने वाहवा
–यापूर्वी जगातील कोणत्याच क्रिकेट संघाच्या कर्णधाराने असा निर्णय घेतला नसेल
–१९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाला श्रीलंकेने दिला धक्का
–इंग्लंड येणार गोत्यात, महत्त्वाचा खेळाडू जायबंदी