---Advertisement---

द्विशतकाच्या निरुत्साही सेलिब्रेशननंतर विलियम्सन झाला ट्रोल; ‘या’ सहकाऱ्यानेच उडवली खिल्ली

On: रविवार, डिसेंबर 6, 2020 4:03 PM
---Advertisement---

न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मायदेशातील पहिल्या कसोटी सामन्यात शानदार द्विशतक झळकाविले. न्यूझीलंडकडून पहिल्या डावात ४१२ चेंडूत २१२ धावांची मॅराथाॅन खेळी करत विलियम्सनने न्यूझीलंडच्या संघाला ७ बाद ५१९ अशी विशाल धावसंख्या उभारण्यात मदत केली. याच खेळीच्या बळावर न्यूझीलंड संघाने विंडीजचा एक डाव आणि १३४ धावांनी पराभव करत २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

मात्र सामना संपल्यानंतर सोशल मिडीयावर विलीयम्सन वेगळ्याच कारणाने चर्चेत आला. द्विशतक पूर्ण केल्यानंतर प्रेक्षकांना बॅट उंचावून अभिवादन करताना विलीयम्सनच्या चेहऱ्यावरील भाव काहीसे कंटाळवाणे होते. त्याचा हा निरुत्साह पाहून न्यूझीलंड संघातील अष्टपैलू जिमी नीशमने मजेशीर कमेंट करत विलियम्सनची खिल्ली उडवली.

जिमी नीशमने केले ट्विट  

न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जिमी नीशम नेहमीच सोशल मिडीयावर गमतीशीर पोस्ट करत असतो. यावेळी त्याच्या निशाण्यावर चक्क न्यूझीलंडचा कर्णधारच आला. विंडीजविरुद्ध द्विशतक साजरे करताना विलीयम्सनने निरुत्साही अभिवादन केले. त्याच्या या चेहऱ्याकडे बघून त्याच्या मनात काय असेल, हे सांगणारं ट्विट नीशमने केलं. विलीयम्सनचा फोटो पोस्ट करत त्याने लिहिलं, “माफ करा. खरतरं मला द्विशतक काढायचे नव्हते, परंतु कर्तव्य असल्याने ते पार पाडावेच लागले.”

विलियम्सनच्या कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या 

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने या द्विशतकासह आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. त्याच्या २५१ धावांच्या मदतीने न्यूझीलंडने ५१९ धावांचा डोंगर उभा केला. त्याच्या प्रत्युतरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव १३८ धावांवर संपुष्टात आला. फॉलोऑन मिळाल्यानंतर देखील विंडीज संघ २४७ धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे न्यूझीलंडने एक डाव आणि १३४ धावांनी दणदणीत विजय मिळविला. द्विशतकवीर केन विलियम्सनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या – 

दक्षिण आफ्रिका वि. इंग्लंड : पहिली वनडे पुन्हा रद्द; यावेळी खेळाडू नाही हॉटेल स्टाफला कोरोनाची लागण

‘बर्थडे बॉय’ श्रेयस अय्यरने टिपला अफलातून झेल, पाहा Video

नेतृत्त्व कसे करावे हे विराटने ‘या’ खेळाडूकडून शिकावे, मोहम्मद कैफची कोहलीवर टीका

ट्रेंडिंग लेख –

गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग

‘बर्थडे बॉय’ रविंद्र जडेजाबद्दल या खास १० गोष्टी माहित आहेत का?

भारताच्या ‘या’ ५ दिग्गज क्रिकेटपटूंचा आज आहे वाढदिवस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---