टी20 विश्वचषक 2022 तोंडावर आला असताना न्यूझीलंड क्रिकेटसाठी एक वाईट बातमी पुढे आली आहे. न्यूझीलंडचा धाकड अष्टपैलू जिम्मी नीशम याने बोर्डाचा केंद्रिय करार स्विकारण्यास नकार दिला आहे. न्यूझीलंड संघासाठी हा मोठा झटका ठरू शकतो. नीशमबरोबरच वेगवान गोलंदाज ब्लेयर टिकर यानेही केंद्रीय करारात सहभागी होण्यास नकार दिला आहे.
31 वर्षीय नीशम (Jimmy Neesham) न्यूझीलंड संघात ट्रेंट बोल्ट आणि कॉलिन डी ग्रँडहोमची कमी पूर्ण शकला असता. बोल्टने त्याच्या कुटुंबियांसोबत अधिक वेळ घालवण्यासाठी आणि जगभरातील टी20 लीग खेळण्यासाठी यावर्षाच्या सुरुवातीला केंद्रीय करारातून आपले नाव मागे घेतले होते. तर डी ग्रँडहोमने ऍडलेड स्ट्राईकर्सद्वारे बिग बॅश लीगसाठी ड्राफ्टमध्ये निवडले गेल्यानंतर त्वरित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
हे दोन खेळाडू संघातून गेल्यानंतर नीशमकडून त्यांची कमतरता पूर्ण करण्याची अपेक्षा होती. परंतु प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर झाल्यानंतर त्याने लगेचच विभिन्न टी20 स्पर्धांमध्ये करार केला, ज्यामुळे त्याने केंद्रिय करार नाकारला आहे.
नीशमने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे आपण बोर्डाचा केंद्रीय करार नाकारत असल्याचे सांगितले आहे. त्याने लिहिले की, “मला माहिती आहे की, माझ्या केंद्रिय कराराला अस्विकार करण्याच्या निर्णयाला याप्रकारे पाहिले जाईल की, मला माझ्या देशाचे प्रतिनिधित्त्व करण्यापेक्षा पैसा जास्त महत्त्वाचा आहे. मी जुलैमध्ये न्यूझीलंड बोर्डाच्या केंद्रीय कराराला स्विकारण्याची योजना बनवली होती. परंतु मला या यादीतून बाहेर करण्यात आल्याने मी जगभरातील इतर लीगमध्ये माझे नाव दिले. हा निर्णय खूप कठीण होता. परंतु न्यूझीलंड क्रिकेटसोबत पुन्हा करार करण्याच्या माझ्या वचनांवर परतण्याऐवजी, मी लीगसाठी केलेल्या वचनबद्धतेचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे.”
“न्यूझीलंडसाठी खेळणे माझ्या कारकिर्दीतील सर्वात सन्मानाची गोष्ट होती. भविष्यात मी माझ्या देशवासींसोबत मैदानात उतरण्यासाठी प्रयत्नशील असेल, खासकरून मोठ्या जागतिक स्पर्धांमध्ये माझ्या देशाचे प्रतिनिधित्त्व करायला मला आवडेल,” असे त्याने शेवटी लिहिले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तब्बल १२२ वनडे खेळून एकही शतक, एकही सामनावीर पुरस्कार न मिळालेला क्रिकेटर पुढे झाला वकिल
सर्व चौकटी मोडून जगात क्रिकेट समालोचनाचा आदर्श घालून देणारी नेरोली मिडोज
सामन्यात खेळाडूंशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानच्या आसिफ अलीने चाहत्याशीही घातली हुज्जत, व्हिडिओ होतोयं व्हायरल





