fbpx
Thursday, January 28, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सर्व चौकटी मोडून जगात क्रिकेट समालोचनाचा आदर्श घालून देणारी नेरोली मिडोज

Australian Commentator Neroli Meadows Birthday Special

September 16, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: iNSTAGRAM/nezm

Photo Courtesy: iNSTAGRAM/nezm


पितृसत्ताक व्यवस्था… एक अशी सामाजिक सामाजिक व्यवस्था जिथे महिलांना पुरुषांपेक्षा कमी दर्जाची वागणूक दिली जाते. कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक असे सर्व प्रकारचे निर्णय पुरुषांच्या हाती असतात.

एक काळ असा होता, जेव्हा फक्त भारत देशातच नव्हे तर पूर्ण जगात पितृसत्ताक व्यवस्था होती. पण वेळेनुसार ही व्यवस्था मोडकळीस आली आणि महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात पुढे येऊ लागल्या. २१व्या शतकातील स्त्री तर कोणत्याच क्षेत्रात मागे नाही. राजकारण, व्यवसाय, मनोरंजन अशा अनेक क्षेत्रांसह महिलांनी क्रिडा क्षेत्रातही झेप घेतली आहे.

जर क्रिकेटविषयी बोलायचं झालं तर, हर्षा भोगले, आकाश चोप्रा, संजय मांजरेकर अशा भारतीय समालोचकांची ख्याती जगभर पसरलेली आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून मैदानावर खेळण्यापासून ते समालोचनापर्यंत, महिलाही त्यांचा सहभाग नोंदवताना दिसत आहेत. आयपीएल, विश्वचषक व ऍशेस सिरीजसारख्या मोठ-मोठ्या टूर्नामेंटमध्ये ईसा गुहा, लिसा स्टॉकर, चार्लोट एडवर्ड्स अशा कित्येक महिला कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसल्या आहेत.

अशात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नुकतीच ऑस्ट्रेलियाची प्रसिद्ध महिला समालोचक नेरोली मिडोज हिची आयपीएल २०२०साठी समालोचकांच्या पॅनलमध्ये निवड केली आहे.

पण जगप्रसिद्ध अशा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)मध्ये या ऑस्ट्रेलियन महिला समालोचक नेरोली मिडोजला नक्की का संधी देण्यात आली असावी? ती नक्की आहे तरी कोण? याची सर्वांना उत्सुकता लागली असेल. चला तर जाणून घेऊया, कोण आहे ही नेरोली मिडोज…

१६ सप्टेंबर १९८५ रोजी पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या कॉली शहरातील मिडोज कुटुंबात एक गोंडस अशी मुलगी जन्माला आली. तिचे नाव होते ‘नेरोली मिडोज’. नेरोली ही तिच्या कुटुंबातील सर्वात लहानी मुलगी. तिला रॉस मिडोज नावाचा सर्वात मोठा भाऊ आहे, जो ऑस्ट्रेलियन हॉकीपटू आहे. तर दूसरा भाऊ आयन मिडोज हा एक ऑस्ट्रेलियन अभिनेता आणि लेखक आहे. या २ मोठ्या भावानंतर जन्मलेल्या नेरोलीला पत्रकारिता क्षेत्रात खूप रुची होती. त्यामुळे तिने ऑस्ट्रेलियाच्या कर्टिन विद्यापीठातून पत्रकारितेची शिक्षण पूर्ण केले.

२००२ साली नेरोलीच्या पत्रकारिता कारकिर्दीची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. महत्त्वाचे म्हणजे, तिने क्रिडा क्षेत्राचा रस्ता स्विकारला. तेव्हापासून तिने मागे वळून पाहिले नाही. तिची कडी मेहनत, हजरबाबीपणा, अतिशय रोमांचक प्रश्न विचारण्याची शैली यांमुळे तिला क्रिडा क्षेत्रात भरभरुन यश मिळत गेले. सेव्हन नेटवर्क, नेटवर्क १०, इएसपीएन ऑस्ट्रेलिया अशा मोठ-मोठ्या क्रिडा न्यूज टिव्ही चॅनलमध्ये तिला संधी मिळत गेली.

वेळेनुसार नेरोलीच्या क्रिडा क्षेत्रातील अनुभवात वाढ होत गेली आणि केवळ ऑस्ट्रेलियामध्ये नव्हे तर पूर्ण क्रिकेटविश्वात एक हाय-प्रोफाइल क्रीडा पत्रकार आणि समालोचक म्हणून तिला ओळखले जाऊ लागले.

गेल्या १० वर्षात नेरोलीने क्रिकेटसह फुटबॉल, टेनिस, रग्बी आणि बास्केटबॉल अशा क्रिडा प्रकारात समालोचन केले आहे. गतवर्षीपर्यंत ती युनायटेड स्टेट्सच्या प्रसिद्ध फॉक्स स्पोर्ट्स चॅनलसाठी काम करत होती. पण काही कारणामुळे तिला तिथून काढून टाकण्यात आले. यावर प्रसिद्ध क्रिकेट लेखक लेलोर यांनी आश्चर्य व्यक्त म्हटले होते की, “मी नेरोलीला गेल्या १० वर्षांपेक्षाही जास्त काळ क्रिकेट क्षेत्रात काम करताना पाहिले आहे. ती क्रिडा पत्रकार आणि समालोचन या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ आहे. ती कडी मेहनत करणारी आणि अतिशय रोमांचक प्रश्न विचारी प्रेजेंटर आहे. तिचा क्रिकेट आणि फुटबॉलचा गाढा अभ्यास आहे.”

क्रिकेटवेड्या भारत देशातही नेरोलीचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. अक्षरश: गेल्या १० वर्षांपासून भारतीय चाहते बीसीसीआयकडे नेरोलीची आयपीएलमध्ये समालोचन करण्यासाठी नेमणूक करण्याची विनंती करत होते. बीसीसीआयने चाहत्यांच्या या विनंतीला मान देत यावर्षी नेरोलीला संधी दिली आहे. त्यामुळे १९ सप्टेंबरपासून ते १० नोव्हेंबरपर्यंत संयुक्त अरब अमिरातीत (युएई) खेळण्यात येणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात ती समालोचन करताना दिसणार आहे.

हा नेरोलीच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय क्षणांपैकी एक क्षण असेल. ती आयपीएलमध्ये समालोचक करण्यासाठी खूप उत्सुक आहे. याच नेरोलीचा आज ३४वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नवनियुक्त आयपीएल कमेंटेंटर…!!

ट्रेंडिंग लेख –

जेव्हा मुंबई इंडियन्सच्या ड्वेन ब्रावोसाठी अंबानींनी जमैकाला पाठवले थेट प्रायव्हेट जेट

युएईत होत असलेल्या आयपीएलचा या ४ संघांना होणार मोठा फायदा

चेन्नई सुपर किंग्जने भारतीय क्रिकेट संघाला दिले हे ४ अफलातून खेळाडू

महत्त्वाच्या बातम्या –

जर परदेशी लीगमध्ये भारतीय प्रशिक्षक नसतील, तर भारतीय लीगमध्ये परदेशी प्रशिक्षक का? दिग्गज कडाडला

मलिंगाच्या जागी सहभागी झालेला बुमराहचा संघसहकारी म्हणतोय, बुमराह म्हणजे…

यूएईमध्ये झालेल्या आयपीएल सामन्यांत परदेशी खेळाडूच ठरले होते किंग, फक्त एक भारतीय…


Previous Post

माजी दिग्गज म्हणतो, वॉटसन ‘या’ दोन गोलंदाजांविरुद्ध कसा खेळतो, पाहावे लागेल

Next Post

चेन्नई सुपर किंग्सला चौथ्यांदा आयपीएल चषक मिळवून देऊ शकतात हे ३ महारथी

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ ICC
टॉप बातम्या

कचरा वेचणारा मुलगा ते ‘युनिव्हर्स बॉस’

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/@KKRiders
टॉप बातम्या

मुंबई टू टीम इंडिया व्हाया केरळ! भारतीय संघात नेट बॉलर म्हणून निवड झालेल्या संदीप वॉरियरचा संघर्षमय प्रवास

January 27, 2021
Screengrab: Instagram/@radhika_dhopavakar
टॉप बातम्या

क्वारंटाईनमध्ये रहाणे घालवतोय मुलीसोबत वेळ, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@JamshedpurFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२०-२१ : ब्लास्टर्सची जमशेदपूरची गोलशून्य बरोबरी

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@englandcricket
टॉप बातम्या

वनक्कम टीम इंग्लंड! जो रूटचा संघ पोहोचला चेन्नईत

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@TheRealPCB
टॉप बातम्या

कराची कसोटीत पाकिस्तानला आघाडी, फवाद आलमचे संघर्षपूर्ण शतक

January 27, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ Cricketcomau

चेन्नई सुपर किंग्सला चौथ्यांदा आयपीएल चषक मिळवून देऊ शकतात हे ३ महारथी

Photo Courtesy: Twitter/ KKRiders

आयपीएल २०२० मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी हे ३ खेळाडू ठरणार विजयाचे शिल्पकार?

Photo Courtesy: Twitter/ ICC

४२६० वनडे सामन्यात न घडलेली गोष्ट काल घडली, इतिहास लिहीला गेला सुवर्णांक्षरांनी

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.