भारतीय संघाचे माजी निवडकर्ते सुनील जोशी यांनी रिषभ पंत याच्या अनुपस्थितीत एका अशा खेळाडूचे नाव सांगितले आहे, जो आगामी टी-20 मालिकेत भारताचे प्रतिनिधित्व करू शकतो. सुनील जोशी सध्या आयपीएल फ्रँचायझी पंजाब किंग्जचे फिरकी गोलंदाजीचे प्रशिक्षक आहेत. जोशींच्या मते पंतच्या अनुपस्थितीत ईशान किशन आणि संजू सॅमसनसोबतच जितेश शर्मा देखील दावेदार आहे. जितेशला कोणत्याही क्षणी भारतीय संघात सामील केले जाऊ शकते, असेही जोशी म्हणाले.
भारतीय संघाच्या मागच्या दोन टी-20 मालिकांमध्ये जितेश शर्मा (Jitesh Sharma) याला संधी मिळाली होती. मात्र, प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला जागा बनवता आली नाही. मागच्या 24 महिन्यांमध्ये पंजाब किंग्जकडून इंडियन प्रीमियर लीगमध्ये अप्रतिम प्रदर्शन केले आहे. या प्रदर्शनाच्या जोरावर त्तो येत्या काळातही भारतीय संघातही स्थान मिळवू शकतो. सुनील जोशी (Sunil Joshi) यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना जितेश शर्माविषयी विश्वास व्यक्त केला. जोशी म्हणाले, “जितेश शर्मा एक अप्रतिम खेळाडू आहे. संजू सॅमसनला डावलून त्याला भारतीय संघात निवडले गेले होते. यावरूनच त्याची गुणवत्ता सिद्ध होते. मागच्या 18 महिन्यांमध्ये देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमधील त्याच्या प्रदर्शनामुळे तो इतर यष्टीरक्षकांच्या पुढे आहे.”
मागच्या वर्षी डिसेंबर मिहन्यात रिषभ पंत कार अपघाताचा शिकर बनला. पंतचा या अपघातात गंभीर दुखापत झाली असून पुढचा मोठा काळ तो संघासाठी खेळू शकणार नाहीये. पंतच्या अनुपस्थितीत ईशान किशन आणि संजू सॅमनस भारतीय संघात यष्टीरक्षक म्हणून दावेदार आहे. पण सुनील जोशींच्या मते जितेश शर्मा देखील संघात जागा मिळवू शकतो. मुलाखतीत ते पुढे म्हणाले, “जितेश मागच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाचा भाग होता. त्याचे काम निर्भीडपणे फलंदाजी करणे आहे. तो खेळताना आनंद घेत आहे आणि पंजाबसाठी आपली भूमिका पार पाडत आहे.”
आयपीएल 2023मधील जितेश शर्माचे प्रदर्शन
दरम्यान जितेश शर्मा याचे चालू आयपीएल हंगामातील प्रदर्शन पाहिले, तर त्याने 10 सामन्यांमध्ये 26.56च्या सरासरीने 165.97 च्या स्ट्राईक रेटने 239 धावा केल्या आहेत. चालू हंगामात जितेशने आतापर्यंत 16 षटकारही मारले आहेत. (Jitesh Sharma will get a place in the Indian squad ahead of Sanju Samson and Ishan Kishan said Sunil Joshi)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटच्या नावावर आयपीएलचा महाविक्रम! भविष्यातही कोणाला नाही जमणार अशी कामगिरी
नितीश राणाच्या पत्नीला त्रास देणाऱ्या 2 तरुणांना त्यांच्याच घरातून अटक, काय झालेलं वाचाच