माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी हा सातत्याने चर्चेत असतो. सचिन तेंडुलकरचा लहानपणीचा मित्र तसेच भारतीय संघाकडून काही काळ खेळलेला कांबळी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. आपण केवळ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) मिळत असलेल्या पेन्शनवर दिवस काढत असल्याचे कांबळी याने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
एकवेळ भारतातील सर्वात प्रतिभावान क्रिकेटपटूंमध्ये समावेश असलेल्या कांबळी याने म्हटले,
“मी सचिन तेंडुलकरच्या मिडलसेक्स ग्लोबल अकॅडमीमध्ये मेंटर होतो. मात्र, त्यानंतर मी तिथे जाणे बंद केले. रोज पहाटे ५ वाजता उठत असे. यानंतर डी.वाय.पाटील स्टेडियमव आणि बीकेसी ग्राउंडवर संध्याकाळी कोचिंग द्यायचो. माझ्यासाठी ते खूप थकवणारे वेळापत्रक होते. मी निवृत्त क्रिकेटर आहे आणि आता मी पूर्णपणे बीसीसीआयच्या ३०,००० पेन्शनवर अवलंबून आहे.”
तो पुढे बोलताना,
“मला मुंबई क्रिकेट असोसिएशनने काही मदत करावी. ज्याप्रकारे अमोल मुजुमदार याला एमसीएने प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले, तशाच प्रकारची भूमिका मला मिळाल्यास आनंद होईल. सध्या मला कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरी अत्यावश्यक आहे.”
या प्रकरणात तेंडुलकरचा उल्लेख आल्यानंतर तो म्हणाला,
“सचिनला याबाबत माहित आहे. मात्र, मी त्याच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवली नाही. कारण, त्याने याआधी मला खूप मदत केली आहे.”
कांबळी २०१९ मध्ये अखेरच्या वेळी मुंबई टी२० लीगमध्ये प्रशिक्षक म्हणून दिसला होता. शालेय क्रिकेटमध्ये ६६४ धावांची भागीदारी करून सचिन व कांबळी जोडी चर्चेत आली होती. पुढे सचिन लवकरच भारतीय संघात सामील झाला. त्यानंतर काही वर्षांनी कांबळीदेखील भारतीय संघात निवडला गेला. त्याने भारतासाठी १७ कसोटी व १०४ वनडे सामने खेळले. मात्र, कामगिरीत सातत्य राखता न आल्याने त्याला आपली कारकीर्द जास्त लांबवता आली नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अनुभवी संघांना पछाडत नवख्या जर्सीने मारली बाजी! वर्ल्डकप क्वालिफायर्सचे तिकीट केले बुक
एशिया कप। ‘या’ विक्रमामध्ये भारताच्याच खेळाडूंचा बोलबाला! माजी कर्णधार तर अव्वल स्थानावर
सचिनला ओळखत नव्हतो म्हणणाऱ्या अख्तरला आकडेच पाडतायेत तोंडघशी