सध्या दक्षिण आफ्रिकेत दक्षिण आफ्रिका टी20 लीग स्पर्धेचा पहिला हंगाम खेळला जात आहे. स्पर्धेचा हा हंगाम अत्यंत रोमांचक सुरू असतानाच, जो’बर्ग सुपर किंग्स संघाला एक मोठा धक्का बसला. संघाचा प्रमुख फिरकीपटू ऍरॉन फंगिसो याला अवैध गोलंदाजी शैलीमूळे निलंबित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने घालून दिलेल्या नियमांचे तो उल्लंघन करत असल्याचे देण्यात आलेल्या अहवालात नमूद केले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केलेल्या फंगिसोकडे सुपर किंग्स संघाच्या क्रिकेट गोलंदाज विभागाचे नेतृत्व होते. त्याने या स्पर्धेत आत्तापर्यंत 6 सामने खेळताना 10 बळी टिपले आहेत. यामध्ये दोन वेळा 4 बळी घेण्याची कामगिरी त्याने करून दाखवली. फंगिसो याच्या गोलंदाजी शैलीवर 17 जानेवारी रोजी आक्षेप घेतला गेला होता. त्यानंतरही त्याने 20 जानेवारी रोजी ईस्टर्न केप संघाविरुद्ध सामना खेळला.
स्पर्धेतील संशयास्पद गोलंदाजी शैलीची चाचणी करणाऱ्या समितीने मंगळवारी (24 जानेवारी) आपला अहवाल सादर केला. यामध्ये त्यांनी फंगिसो याला दोषी ठरवले. या समितीत सामनाधिकारी प्रतिनिधी गॅरी पायनर, दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू वर्नान फिलॅंडर व दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे हायपरफॉर्मन्स मॅनेजर विन्सेंट बार्नस यांचा समावेश होता.
फंगिसो अशा प्रकारच्या प्रकरणात चर्चेत येण्याची ही दुसरी वेळ आहे. 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील एका देशांतर्गत स्पर्धेवेळी त्याची गोलंदाजी संशयास्पद असल्याचे म्हटले गेलेले. मात्र, त्यावेळी त्याचे निर्दोष सुटका झाली होती. सध्या 38 वर्षांच्या असलेल्या फंगिसो याने दक्षिण आफ्रिकेसाठी 21 वनडे व 16 टी20 सामने खेळले आहेत. त्याने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना 2018 मध्ये खेळला होता.
(Joburg Super Kings’ spinner Aaron Phangiso has been suspended from bowling in the SA20 due to illegal bowling action)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: सूर्या बनला 2022 आयसीसी टी20 क्रिकेटर ऑफ द इयर; तीन दिग्गजांना मागे टाकत उमटवली मोहोर
BREAKING: आणखी एक आयसीसी पुरस्कार भारतात! रेणुका ठाकूर ठरली एमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर