इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट (Joe Root) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. शानदार फलंदाजीमळे जो रूटला सध्या सर्वोत्तम कसोटी फलंदाज म्हटले जात आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रूटने लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर दोन्ही डावात शतकं झळकावून अनेक मोठे रेकाॅर्ड आपल्या नावावर केले आहेत. तत्पूर्वी ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) ‘वर्ल्ड रेकाॅर्ड’ जो रूटच्या निशान्यावर आहे.
1877 मध्ये कसोटी क्रिकेटला सुरुवात झाली, तेव्हापासून आतापर्यंत म्हणजेच 147 वर्षांत जो रूट ()Joe Root) हा इंग्लंडसाठी सर्वाधिक शतकं ठोकणारा फलंदाज ठरला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत रुटनं पहिल्या डावात 33वं कसोटी शतक आणि दुसऱ्या डावात 34वं कसोटी शतक झळकावलं. या धमाकेदार कामगिरीमुळे रूटची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतकं पूर्ण झालीआहेत.
आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकाॅर्ड सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर आहे. तेंडुलकरच्या नावावर 200 कसोटी सामन्यांमध्ये 15,921 धावा आहेत. तर रूटने केवळ 145 कसोटी सामन्यात 12,377 धावा केल्या आहेत. रूट आता सचिनपेक्षा 3,544 धावांनी मागे आहे.
रूटच्या कसोटी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने इंग्लंडसाठी कसोटीत 2012 मध्ये भारताविरुद्ध पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने 145 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये 50.33च्या सरासरीने 12,377 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये त्याने 34 शतकं झळकावले आहेत. कसोटीमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 254 आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
5 भारतीय खेळाडू जे आयपीएलमध्ये फक्त एकाच संघासाठी खेळले
लखनऊ रोहितला खरेदी करण्यास उत्सुक? कोच जॉन्टी रोड्सचा मोठा दावा
चेन्नई सुपर किंग्जच्या दिग्गजाची निवृत्तीची घोषणा, या मोसमात खेळणार शेवटचा सामना