वनडे विश्वचषक 2023 मध्ये शनिवारी (11 नोव्हेंबर) पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्या दरम्यान सामना खेळला जात आहे. दोन्ही संघ या आधीच विश्वचषकातून बाहेर पडल्याने या सामन्यात इंग्लंड संघाने आक्रमक फटकेबाजी केली. यादरम्यान इंग्लंडचा सर्वात अनुभवी फलंदाज जो रूट याने शानदार अर्धशतक झळकावले. यावेळी तो वन डे विश्वचषकात इंग्लंडकडून 1000 धावा बनवणारा पहिला फलंदाज बनला.
कोलकाता येथील ईडन गार्डनवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात इंग्लंड संघाला जॉनी बेअरस्टो व डेव्हिड मलान यांनी अर्धशतकी भागीदारी रचली. मलान बाद झाल्यानंतर फलंदाजाला आलेल्या जो रूट याने आपल्या अनुभवाचा फायदा उचलत पाकिस्तानच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला. बाद होण्यापूर्वी त्याने 72 चेंडूंमध्ये 60 धावांची खेळी केली. यामध्ये चार चौकारांचा समावेश होता.
आपल्या या खेळी दरम्यान त्याने वनडे विश्वचषकात इंग्लंडकडून एक हजार धावा बनवल्या. त्याच्या खात्यात आता 1034 धावा जमा आहेत. अशी कामगिरी करणारा तो इंग्लंडचा पहिला फलंदाज ठरला. या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचे माजी सलामीवीर ग्रॅहम गूच आहेत. त्यांनी विश्वचषकात इंग्लंडसाठी 897 भावा बनवल्या होत्या. तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर अनुक्रमे बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टो आहेत. त्यांनी अनुक्रमे 769 व 747 धावा विश्वचषकात बनवल्या आहेत.
रूट या विश्वाच्या इंग्लंड साठी हवे तसे कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. त्याला या विश्वचषकात तीन अर्धशतके पूर्ण करता आली.
(Joe Root Complete 1000 Runs In ODI World Cup First Englishman Achieve This)
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानविरुद्धचा सामना माझा कारकिर्दीतील शेवटचा सामना असू शकतो, इंग्लंडच्या खेळाडूचं धक्कादायक विधान
शुबमन गिल आणि सारा तेंडुलकरच्या नात्यावर लागली मोहर! खास व्यक्तिने महत्वाची माहिती