इंग्लंड संघाच्या कसोटी संघाचा कर्णधार ज्यो रुट वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर होवु शकतो. रुटच्या दुसऱ्या मुलाचा जन्म होणार असल्यामुळे तो पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्याची संभावना कमी आहे.
८ जुलै रोजी इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. ही मालिका प्रेक्षकांशिवाय खेळवली जाणार आहे.
आपल्या दुसऱ्या आपत्याच्या जन्मावेळी रुट उपस्थित राहणार आहे. तसेच वेळ पडली तर पहिल्या कसोटीत तो खेळणारही नाही. यावेळी तो आपल्या पत्नीसोबत राहण्याचा विचार करत आहे.
यामुळे रुटच्या जागी यावेळी संघात कर्णधारपद बेन स्टोक्स सांभाळेल असे बोलले जात आहे.
इंग्लंड आणि विंडीज संघात होणाऱ्या कसोटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
8 ते 12 जुलै- पहिला कसोटी सामना- एजस बाऊल, हॅम्पशायर
16 ते 20 जुलै- दुसरा कसोटी सामना- ओल्ड ट्रॅफर्ड, लँकेशायर
24 ते 28 जुलै- तिसरा कसोटी सामना- ओल्ड ट्रॅफर्ड, लँकेशायर
ट्रेंडिंग घडामोडी-
-चक्क! लॉकडाऊनमध्ये धोनीने विकत घेतला ट्रॅक्टर; पहा तुफान व्हायरल व्हीडिओ
-‘कॅप्टन कूल’ धोनीच्या नेतृत्वात निवृत्ती घेणारे टीम इंडियाचे ३ दिग्गज खेळाडू