नवी दिल्ली । क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण सध्या ती गोष्ट ऐकायला मिळाली आहे, ज्याची ते मागील 3 महिन्यांपासून लॉकडाऊनुळे वाट पाहत होते. खरंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मंगळवारी (2 मे) वेस्ट इंडीजविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यास सरकारने परवानगी दिली असल्याचे सांगितले. या मालिकेतील तिन्ही कसोटी सामने बंद दारामागे म्हणजेच प्रेक्षकांविना खेळण्यात येणार आहेत.
लॉकडाऊनमुळे (Lockdown) बंद पडलेल्या आतंरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. विशेष म्हणजे ईसीबीने (England and Wales Cricket Board) विंडीजविरुद्ध देशांतर्गत मालिकेचे वेळापत्रकदेखील जाहीर केले आहे.
असे होतील सामने
इंग्लंड आणि विंडीज (England and West Indies) या देशांमधील कसोटी मालिकेची सुरुवात 8 ते 12 जुलै दरम्यान साउथॅंप्टन येथील पहिल्या कसोटी सामन्यापासून होणार आहे. मालिकेतील दुसरा सामना 16 ते 20 जुलै दरम्यान मँचेस्टर येथे खेळण्यात येणार आहे. तसेच मालिकेतील शेवटचा कसोटी सामना 24 ते 28 जुलै दरम्यान मँचेस्टर येथे खेळण्यात येणार आहे. विंडीजचा संघ 9 जूनला इंग्लंड येथे पोहोचणार आहे. तसेच 14 दिवसापर्यंत विंडीजच्या सर्व खेळाडूंना क्वारंटाईन केले जाणार आहे.
इंग्लंड आणि विंडीज संघात होणाऱ्या कसोटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
8 ते 12 जुलै- पहिला कसोटी सामना- एजस बाऊल, हॅम्पशायर
16 ते 20 जुलै- दुसरा कसोटी सामना- ओल्ड ट्रॅफर्ड, लँकेशायर
24 ते 28 जुलै- तिसरा कसोटी सामना- ओल्ड ट्रॅफर्ड, लँकेशायर






