Joe Root Records: जो रूटने भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत इतिहास रचला आहे. त्याने 178 चेंडूंमध्ये आपल्या कसोटी कारकिर्दीतील 38 वं शतक पूर्ण केले. याचसोबत त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत कुमार संगाकाराची बरोबरी केली आहे. रूटने याचसोबत कसोटीत भारताविरुद्ध सर्वाधिक शतके (Most Centuries vs India) झळकावण्याचा रेकाॅर्डही आपल्या नावावर केला आहे. भारताविरुद्धचे हे त्याचे एकूण 12 वं कसोटी शतक आहे. (Joe Root Test century)
जो रूटने आपल्या ऐतिहासिक कसोटी कारकिर्दीत भारताविरुद्ध आता 12 शतके झळकावली आहेत. मँचेस्टर कसोटीपूर्वी या बाबतीत जो रूट आणि स्टीव्ह स्मिथ 11 शतकांसह संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होते. आता रूट सर्वात पुढे निघून गेला आहे. स्मिथ आणि रूट वगळता अन्य कोणताही फलंदाज भारताविरुद्ध 10 कसोटी शतकांचा टप्पाही गाठू शकलेला नाही (Most Test centuries against India)
भारताविरुद्ध कसोटीत सर्वाधिक शतके– (Most Test centuries against India)
जो रूट – 12 शतके
स्टीव्ह स्मिथ – 11 शतके
गॅरी सोबर्स – 8 शतके
विव रिचर्ड्स – 8 शतके
रिकी पाँटिंग – 8 शतके
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत जो रूट आता संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आला आहे. कुमार संगाकारा आणि जो रूटच्या नावावर आता कसोटीत 38 शतके आहेत. या बाबतीत त्याच्या पुढे फक्त सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग आणि जॅक कॅलिस आहेत. रूट यापूर्वीच कसोटीत इंग्लंडसाठी सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे. (Test cricket records)
कसोटीत सर्वाधिक शतके– (Most centuries in Tests)
सचिन तेंडुलकर – 51 शतके
जॅक कॅलिस – 45 शतके
रिकी पाँटिंग – 41 शतके
जो रूट – 38 शतके
कुमार संगाकारा – 38 शतके






