सध्या न्यूझीलंडचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात 3 कसोटी सामन्यांची मालिका आयोजित करण्यात आली आहे. यातील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडवर मात करत मालिकेत १-०ने आघाडी घेतली. या मालिकेतील दुसरा सामना सध्या नॉटिंघमच्या मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यांत जो रुटने शतक झळकावत भारताचा फलंदाज विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
नाटिंघम येथे न्युझीलंड (New Zeland) आणि इंग्लंड (England) यांच्यात मालिकेचा हा दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकुन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. डॅरिल मिचेलच्या (Dareyl Mitchel) १९० आणि टॉम ब्लंडलच्या (Tom Blundel) १०६ धावांच्या मदतीने न्युझीलंडने ५५३ धावांचा डोंगर उभा केला. या धावांचा सामना करताना पहिल्या डावात यजमान संघाची सुरूवात चांगली झाली नाही. पण, ओली पोप सोबत मिळुन जो रुटने (Joe Root) इंग्लंडचा डाव सावरला. पोप १४५ धावांवर बाद झाला तर रुटने मालिकेचे दुसरे शतक लगावले. हे शतक लगावल्यानंतर त्याने कसोटी शतकांच्या बाबतीत स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि विराट कोहलीची (Virat Kohli) बरेबरी केली आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यांत रुटने लागवलेले शतक त्याच्या कारकिरर्दीतले २७वे शतक आहे. या २७ व्या शतकाच्या मदतीने त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधित शतक झळकावण्याच्या यादीत विराट कोहली आणि स्मिथची बरोबरी करत १७व्या स्थानी मजल मारली आहे. सध्या कसोटी क्रिकटमध्ये सर्वात जास्त शतके लगावण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या नावे आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत ५१ शतके झळकावली आहेत.
दरम्यान, जो रूट २०२१ पासून कमालाच्या फॉर्मामध्ये आहे. मागच्या ४२ कसोटी डावात त्याने आतापर्यंत १२ शतके लगावली आहेत. विशेष म्हणजे या काळात विराट कोहली आणि स्टीव स्मिथ यांना काही खास करता आलेले नाही. कोहलीला गेल्या २ वर्षात एकही शतक लगावता आलेले नाही. याआधी रुटने वेस्टइंडीजच्या विरुद्ध २ शतके लगावली होती. तसेच, जेव्हा भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता तेव्हा त्याच्या बॅटमधुन नाटिंघम आणि लार्ड्स या मैदानावर त्याने लागोपाठ २ शतके लगावली होती. त्यामुळे आता लवकरत रुटआणखी एक शतक लगावत कोहली आणि स्मिथला पिछाडीवर टाकेल अशी भविष्यवाणी वर्तवणयात येत आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
हेही वाचा-
दुसऱ्या सामन्यांत बाद होताच ऋतूराजवर मीम्सचा वर्षाव, पाहा चाहत्यांच्या तिखट प्रतिक्रिया
श्रेयसने ४० धावा केल्या अन् युवराजचा विक्रम मोडीत काढला, वाचा काय आहे विक्रम
भारताला हरवण्यासाठी दक्षिण आफ्रिकी कर्णधाराने खेळला गेम, ‘या’ घातक खेळाडूचा केला वापर