---Advertisement---

IPL 2024 मधून खेळाडूंच्या माघारीचे सत्र सुरूच! स्टोक्सपाठोपाठ आणखी एका इंग्लिश सुपरस्टारची ना

---Advertisement---

आयपीएल 2024 साठी खेळाडूंना कायम राखण्याची अंतिम तारीख रविवारी (26 नोव्हेंबर) समाप्त होत आहे. सर्व संघ आपापल्या उत्कृष्ट खेळाडूंना कायम राखतील तर उर्वरित खेळाडूंना करारमुक्त करतील. ही सर्व लगबग सुरू असताना आता इंग्लंडचा फलंदाज जो रूट याने आगामी हंगामासाठी आपण उपलब्ध नसल्याचे कळवले आहे. राजस्थान रॉयल्सने याबाबतची अधिकृत घोषणा केली. रूट मागील हंगामात राजस्थान संघाचा भाग होता. इंग्लंडचा कसोटी कर्णधार व अष्टपैलू बेन स्टोक्स याने यापूर्वीच आयपीएल 2024 मधून माघारी घेतली आहे.

राजस्थान रॉयल्सने अधिकृत पोस्ट करत याबाबत माहिती दिली. राजस्थान संघाचा मेंटर कुमार संगकारा याने याबाबत माहिती देताना म्हटले,

“आम्ही खेळाडूंचे रिटेन्शन करण्याबाबत सर्व खेळाडूंशी चर्चा करत होतो. त्यावेळी रुटने आपण पुढील हंगामासाठी उपलब्ध नसल्याचे सांगितले. मागील हंगामात त्याच्या अनुभवाचा आमच्या युवा खेळाडूंना चांगलाच फायदा झाला. आम्ही त्याच्या भविष्यासाठी त्याला शुभेच्छा देतो.”

रूट मागील वर्षी पहिल्यांदाच आयपीएल खेळला होता. त्याला राजस्थानने एक कोटी रुपयांना आपल्याशी करारबद्ध केले होते. मात्र, त्याला हंगामात केवळ तीन सामने खेळण्याची संधी मिळाली.

(Joe Root has opted out of IPL 2024)

महत्वाच्या बातम्या – 
“चॅम्पियन बॅटर तयार होतोय” World Cup गाजवलेल्या श्रेयसचे अश्विनकडून कौतुक
IPL 2024 । ‘तर मुंबईच्या हाती…’, हार्दिक पंड्याच्या बातम्या वाचून अश्विनची लक्षवेधी प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---