जो रूट (Joe Root) याने इंग्लंडसाठी कर्णधाराच्या भूमिकेत नवा इतिहास रचला आहे. रूटने शनिवारी (१२ मार्च) अँटिग्वा येथे वेस्ट इंडिज विरुद्ध (WIvENG) पहिल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी शानदार शतक झळकावले. त्याच्याशिवाय झॅक क्राऊलीने १२१ धावांची शतकी खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर इंग्लंडने यजमान वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी २८६ धावांचे लक्ष्य ठेवले.
इंग्लंडने पहिल्या डावात ३११ धावा केल्या होत्या. तर, वेस्ट इंडिज संघ पहिल्या डावात ३७५ धावांवर सर्वबाद झाला. यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात ६ बाद ३४९ धावा करून डाव घोषित केला आणि वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी २८६ धावांचे आव्हान ठेवले.
Nobody has more Test centuries as Test captain of England 🦁
Match Centre: https://t.co/gfeafIbJ4L
🏝 #WIvENG 🏴 | @Root66 pic.twitter.com/y7sUSTjs5P
— England Cricket (@englandcricket) March 12, 2022
जो रूटच्या कारकिर्दीतील हे २४ वे कसोटी शतक ठरले. यासह त्याने कर्णधार म्हणूनही नवा इतिहास रचला आहे. रुट आता इंग्लंडकडून कसोटीत सर्वाधिक शतके करणारा कर्णधार बनला. त्याने आतापर्यंत कसोटीत १० हजार धावा पूर्ण केल्या आहेत. रुटने १८८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे वेस्ट इंडिजविरुद्धचे चौथे आणि वेस्ट इंडिजच्या भूमीवरील तिसरे शतक आहे. २०२२ वर्षातील रूटचे हे पहिले शतक आहे.
रूटने २४ वे कसोटी शतक झळकावताच केविन पीटरसनचा 24 कसोटी शतकांचा विक्रम मागे टाकला आहे. ऍलिस्टर कुकच्या नावावर आता इंग्लंडकडून कसोटीत ३३ शतके आहेत. कर्णधार म्हणून रुटचे हे 13 वे शतक आहे आणि त्याने या बाबतीत कर्णधार म्हणून कुकच्या १२ कसोटी शतकांना मागे टाकले आहे. इंग्लंडच्या दिग्गज क्रिकेटपटू ग्रॅहम गूच ११ कसोटी शतक यांसह या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी आहेत. पीटर मे व अँड्रु स्ट्रॉस यांनी अनुक्रमे १० आणि ९ शतके इंग्लंडचे नेतृत्व करताना झळकावली होती.
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल सुरू होण्याआधी दिसला हार्दिक पांड्याचा नवा अवतार, बनला ‘बॉम्ब एक्सपर्ट’ (mahasports.in)