श्रीलंका आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना नुकताच गाले येथे पार पडला आहे. या सामन्यात इंग्लंडने उत्तम कामगिरी करत श्रीलंकेचा 7 विकेटने पराभव केला. मात्र हा सामना क्रिकेट बरोबरच चर्चेत राहिला तो इंग्लंडच्या एका फॅन साठी. इंग्लंडच्या रॉब लुईस नामक समर्थकाने तब्बल दहा महिने श्रीलंकेला राहत इंग्लंडच्या सामन्याची वाट बघितली होते. मात्र कोरोनामुळे त्याला मैदानात येऊन सामना बघणे शक्य झाले नाही. यादरम्यानच इंग्लंडचा कर्णधार जो रुटने सामना संपल्यानंतर रॉबला फोन करत त्याचे आभार मानले आहे.
रूट फोनवर म्हणाला ,” तुला स्टेडियम शेजारच्या किल्ल्यावर बघून निश्चितच आनंद झाला. मी सर्व संघाच्यावतीने तुझे आभार मानण्यासाठी आलो आहे. तू वर्षभर जो प्रवास करत संघाला सपोर्ट केला त्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत.”
रुट पुढे म्हणाला, “हा विजय तुझ्यासोबत साजरा करणे संपूर्ण संघासाठी आनंददायी आहे. मला आशा आहे की आमच्या कामगिरीने तुला आनंद मिळाला असेल. पुन्हा एकदा तुझ्या सपोर्ट साठी खूप खूप धन्यवाद.”
Five days graft for the lads 💪
Ten-month wait for a super fan 👏
One very important phone call…@Root66 📲 @elitebandwagon pic.twitter.com/fu1ir1hgwg
— England Cricket (@englandcricket) January 18, 2021
रॉबने इंग्लंडचा सामना बघण्यासाठी मागील तब्बल दहा महिने श्रीलंकेत वास्तव्य केले होते. मार्च 2019 मध्ये इंग्लंडचा श्रीलंका दौरा निश्चित झाला होता, मात्र कोरोनामुळे तो पुढे ढकलण्यात आला. या कठीण परिस्थितीतही संघाला सपोर्ट करण्यासाठी रॉबने श्रीलंकेत राहण्याचा निर्णय घेतला होता. रॉबच्या या क्रिकेट प्रेमाचे संपूर्ण क्रिकेटविश्व कडून कौतुक केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
अजिंक्य रहाणेने पुन्हा जिंकली करोडो भारतीयांची मने ! बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सोपवली टी नटराजनच्या हाती