---Advertisement---

व्हिडिओ : कर्णधार रहाणेचा आक्रमक अंदाज, नॅथन लाॅयनला ठोकला खणखणीत षटकार

---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय संघासमोर विजयासाठी 328 धावांचे लक्ष देण्यात आले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने सामना अनिर्णित राखण्याचा प्रयत्न न करता विजयाकडे वाटचाल केली.

रोहित शर्माला लवकर गमावल्यानंतर शुभमन गिलने 91 धावांची शानदार खेळी केली. गिल बाद झाल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे मैदानात उतरला. अजिंक्यने देखील पहिल्या चेंडूपासूनच आपले इरादे स्पष्ट केले होते. यादरम्यानच अजिंक्यने नेथन लायनच्या एका चेंडूवर खणखणीत षटकार ठोकला.

भारताच्या डावातील 56 वे षटक टाकण्यासाठी आलेल्या नेथन लायनच्या पहिल्याच चेंडूवर अजिंक्यने स्टेप आउट होऊन लाँग ऑनच्या दिशेने खणखणीत षटकार ठोकला. ब्रिस्बेन सारख्या मोठ्या मैदानात देखील अजिंक्यने इतक्या लांब षटकार मारल्याने सर्व भारतीय रसिकांना आनंद झाला.

अजिंक्य या षटकारानंतर पूर्णतः आक्रमक जाणवत होता व तो भारताला एकहाती सामना जिंकून देणारा अशी चिन्हे दिसत होती. मात्र कमिंसच्या एका चेंडूवर आक्रमक फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. अजिंक्यने 22 चेंडूंमध्ये 24 धावांची आक्रमक खेळी करत भारतीय संघाच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या:

बॉर्डर-गावसकर चषकात भारताचे निर्विवाद वर्चस्व, तब्बल इतक्या वेळा जिंकली आहे मालिका

भारताच्या ऐतिहासिक विजयाचे एबी डिविलियर्सकडून खास कौतुक, म्हणाला

जो रूटने केला त्या जबरा इंग्लंड फॅनला फोन, पाहा व्हिडिओ

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---