---Advertisement---

भारताच्या ऐतिहासिक विजयाचे एबी डिविलियर्सकडून खास कौतुक, म्हणाला…

On: मंगळवार, जानेवारी 19, 2021 3:26 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची बॉर्डर गावसकर मालिका खेळली गेली. या चार सामन्यातील मालिकेतील चौथा कसोटी सामना गाबा येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने रिषभ पंत आणि शुबमन गिलने खेळलेल्या वादळी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने 3 विकेट्स विजय मिळवला. त्यामुळे भारतीय संघाने चार सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने जिंकली. ऑस्ट्रेलियन भूमीत कसोटी मालिका जिंकण्याती भारताची ही दुसरी वेळ आहे. तसेच ऑस्ट्रेलियाला 32 वर्षांनंतर पहिल्यांदाच ब्रिस्बेनमध्ये पराभूत करण्याची किमया भारताने केली आहे. भारताच्या या विजयानंतर दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिविलियर्सने सोशल मीडियावरून भारतीय संघाचे अभिनंदन केले.

गाबा येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चौथा कसोटी सामना खेळला.या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने 328 धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने हे लक्ष्य 97 षटकांत 7 विकेट्स गमावू 329 धावा करत हा सामना जिंकला. त्यामुळे भारतीय संघाने बॉर्डर गावसकर मालिका आपल्या नावावर केली.

एबी डिविलियर्स भारतीय संघाचे अभिनंदन करताना ट्विट केले की, “काय, कसोटी सामना होता! भारतीय क्रिकेट संघाच्या प्रतिभेचा स्तर भयानक आहे. रिषभ पंत, हा तरुण खेळाडू छान खेळला. कसोटी क्रिकेट हे सर्वात बेस्ट क्रिकेट आहे.” हे ट्विट करताना त्याने हे ट्विट करताना रिषभ पंतचा उल्लेख देखील केला आहे.

भारतीय संघाकडून चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या डावात प्रत्येक खेळाडूने विजयात महत्त्वाचे योगदान दिले. यामध्ये भारतीय संघाकडून शुबमन गिलने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 146 चेंडूचा सामना करताना 8 चौकार आणि 2 षटकार खेचत 91 धावांची खेळी साकारली. तसेच रिषभ पंतने त् 138 चेंडूचा सामना करताना 9 चौकार आणि 1 गगनचुंबी षटकार ठोकत नाबाद 89 धावांची खेळी केली. त्याचबरोबर चेतेश्वर पुजाराने 211 चेंडूचा सामना करताना 7 चौकार ठोकत 56 धावांची खेळी केली.

भारतीय संघकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या आणि त्यासाठी त्याने 73 धावा खर्च केल्या. त्याचबरोबर शार्दूल ठाकूरने 61 धावा देताना 4 विकेट्स घेतल्या आणि वॉशिंग्टन सुंदरने 80 धावा देत 1 विकेट्स घेतली.

महत्त्वाच्या बातम्या –

‘अजिंक्य सेना’चा बीसीसीआयकडून जयजयकार; ‘इतक्या’ कोटींचा बोनस देत थोपटली पाठ 

अजिंक्य रहाणेने पुन्हा जिंकली करोडो भारतीयांची मने ! बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सोपवली टी नटराजनच्या हाती

जखमी वाघांचा संघ अखेरपर्यंत झुंजला अन् गर्विष्ठ कांगारूंच्या घशातून विजय खेचून आणला! पाहा ‘तो’ अभिमानास्पद क्षण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---