अखेर इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. एजबस्टन क्रिकेट ग्राउंड, बर्मिंघम येथे होणाऱ्या या सामन्यात यजमान संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. यामध्ये पाहुण्या संघाच्या पहिल्या डावाची सुरूवात अडखळतच झाली आहे. भारताने पहिले पाच विकेट्स ९८ धावसंख्या असतानाच गमावले. यावेळी पूर्वकर्णधार जो रुट (Joe Root) याच्या खिलाडूवृत्तीचे दर्शन झाले आहे.
या सामन्यादरम्यान रुटने खिलाडूवृत्ती दाखवत चाहत्यांचे मन जिंकले आहे. झाले असे की, स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) हा ३२वे षटक टाकायला आला असता त्याच्या षटकातील पाचवा चेंडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्या बॅटची कड घेऊन गेला. यष्टीरक्षक सॅम बिलिंग्ज हा झेल पकडण्यासाठी गेला असता तो खूप दूर असल्याने पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रुटने हा झेल घेतला. यावेळी चेंडूने जमिनीला स्पर्श केला का नाही किंवा तो सरळ हातात आला याबाबत त्याला संभ्रमता होती. यामुळे रुटने अंपारला तो झेल नाही असे सांगितले, नंतर तो निर्णय थर्ड अंपायरकडे गेला. त्यांनी सॉफ्ट सिग्नल देत त्याला नॉटआउट दिले. यावेळी जडेजा ५ धावांवर खेळत होता.
थर्ड अंपायरच्या या निर्णयावर ब्रॉडने नाराजी व्यक्त केली. त्याने यानंतर खूप वेळ अंपायरशी चर्चा देखील केली आहे. असे क्षण क्रिकेटमध्ये खूपवेळा दिसले आहेत. यामध्ये अनेक वेळा क्षेत्ररक्षकाला झेल आहे की नाही याबाबत स्पष्टता नसते. रुटच्या संदर्भातही तसेच काहीसे झाले आहे. त्याला तो झेल आहे का नाही मात्र रुटच्या या खिलाडूवृत्तीचे कौतुक होत आहे.
या सामन्यात भारताने पहिल्या दिवसाखेर ७ विकेट्स गमावत ३३८ धावा केल्या आहेत. त्यामध्ये रिषभ पंतच्या १४६ धावांचा समावेश आहे. जडेजा ८३ धावा करत खेळपट्टीवर उपस्थित आहे. पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारत २-१ असा आघाडीवर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिषभ पंतने शतक करताच द्रविडचा दिसला कधीच न पाहिलेला अवतार, Video व्हायरल
भारताची विजयी सलामी, पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेला ४ विकेट्सने झुकवत मालिकेत १-०ने आघाडी
ENGvsIND: पंत-जडेजा जोडीची कमाल सचिन-अझरूद्दीनच्या ‘त्या’ २५वर्षे जुन्या विक्रमाशी केली बरोबरी