जो रूट आता इंग्लंडचा सर्वाधिक यशस्वी कसोटी क्रिकेटपटू बनला आहे. ज्याच कारण म्हणजे मुलतानमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 71 धावा करताच तो कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. यामध्ये जो रूटने माजी कर्णधार ॲलिस्टर कूकला मागे टाकले आहे. ॲलिस्टर कुकने कसोटीमध्ये इंग्लंडसाठी सर्वाधिक 12472 धावा केल्या होत्या. मात्र आता जो रूट त्याच्या पुढे गेला आहे. एवढेच नाही तर तो आता जगातील सर्वाधिक कसोटी धावा करणारा पाचवा खेळाडू बनला आहे.
जो रूटसाठी मुलतान कसोटी सामना अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरत आहे. या बातमी आखेरपर्यंत तो 71 धावांवर फलंदाजी करत होता. या डावात त्याने 2024 मध्ये 1000 धावांचा टप्पा पार करणारा पहिला खेळाडू ठरला. कारकिर्दीत पाचव्यांदा त्याने एका कॅलेंडर वर्षात 1 हजारहून अधिक धावा केल्या. या बाबतीत तो सचिन तेंडुलकरच्या (6 वेळा) मागे आहे. त्याचबरोबर त्याने रिकी पाँटिंग, ब्रायन लारा, जॅक कॅलिस, ॲलिस्टर कुक आणि कुमार संगकारा यांसारख्या दिग्गजांची बरोबरी केली आहे.
या कसोटी सामन्यात जो रूटने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात 5000 धावा करण्याचा दुसरा पराक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. आयसीसीने 2019 मध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिप सुरू केले. त्याची सुरुवात ॲशेस मालिकेपासून झाली. तेव्हापासून तो या फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जो रूट आता पाचव्या स्थानावर आहे. त्याच्या पुढे सचिन तेंडुलकर (15921), रिकी पाँटिंग (13378), जॅक कॅलिस (13289) आणि राहुल द्रविड (13288) आहेत. त्याने अशीच फलंदाजी करत राहिल्यास 2025 पर्यंत तो जगातील दुसरा सर्वाधिक कसोटी धावा करणारा खेळाडू बनू शकतो.
ENGLAND’s greatest ever🔥 Joe Root goes past Sir Alastair Cook for the most for England👏
Breaking one record at a time😍 #PAKvsENG | #TestCricket pic.twitter.com/HHCEeqwDow
— Cricket.com (@weRcricket) October 9, 2024
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा
सचिन तेंडुलकर- 15921
रिकी पाँटिंग- 13378
जॅक कॅलिस- 13289
राहुल द्रविड- 13288
जो रुट- 12473*
ॲलिस्टर कुक- 12472
हेही वाचा-
मोहम्मद शमीचं पुनरागमन लांबलं?, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का!
हा खेळाडू बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खळबळ माजवणार; शेन वॉटसनची मोठी भविष्यवाणी
ind vs ban; मयंक यादवनंतर आता या भारतीय गोलंदाजाची पाळी, दुसऱ्या टी20 मध्ये पदार्पण करणार का?