भारत आणि इंग्लंड यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका शुक्रवारपासून(५ फेब्रुवारी) चेन्नईत सुरू होणार आहे. इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूटसाठी मालिकेचा पहिला सामना हा खूप खास आहे. कारण आपल्या कसोटी कारकिर्दीत जो रूटने आपल्या नावावर एक विशेष विक्रम नोंदवला आहे. हा त्याचा कारकिर्दीतील शंभरावा सामना आहे.
विशेष म्हणजे इंग्लंडकडून त्याने पहिला कसोटी सामना भारतीय भूमीवर खेळला असून आपल्या कारकिर्दीमधील ५०वा कसोटी सामना देखील त्याने याच भारतीय भूमीवर खेळला होता. त्यामुळे या मालिकेपूर्वी रूटने आपला पहिला कसोटी सामना आठवला आणि तो कसा संस्मरणीय होता हे देखील सांगितले.
ऍलिस्टर कुकच्या नेतृत्वाखाली रूटने १३ डिसेंबर २०१२ रोजी नागपूरमध्ये पदार्पण केले होते. त्यात त्याने आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ७६ धावा केल्या होत्या. त्या दरम्यान त्याने २२९ चेंडूंचा सामना केला होता. भारत विरुद्ध इंग्लंडच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा शेवटचा सामना होता. या सामन्यात विराट कोहलीने शतक देखील झळकावले होते आणि धोनीने ९९ धावांच्या खेळी केली होती. हा सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे इंग्लंडने ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकली होती.
आपल्या पहिल्या कसोटी सामन्याची आठवण काढताना जो रूट म्हणाला की, ‘ नागपुरात खेळलेला तो सामना माझ्या कारकिर्दीतील सर्वात अविस्मरणीय सामना होता. मी त्यावेळी क्रिकेटच्या मैदानात चारी बाजूंना पाहत होतो. धोनी स्टंपच्या मागे होता आणि सचिन तेंडुलकर देखील मैदानावर उपस्थित होते. माझा जन्म सुद्धा झाला नसेल तेव्हा सचिन तेंडुलकरने क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याप्रमाणे केविन पीटरसन देखील मैदानात उपस्थित होता, ज्याला पाहून मी माझं बालपण घालवलं होत आणि त्याच्यासारखं खेळण्याचा प्रयत्न देखील केला होता. अशा दिग्गज खेळाडूंच्या सहवासात पदार्पण होणे ही माझ्यासाठी फार आनंदाची आणि महत्त्वाची बाब होती.’
इंग्लंडकडून जो रूटने एकूण ९९ कसोटी सामन्यात ४९.१ च्या सरासरीने ८२२४९ इतक्या धाव केलेल्या असून त्याच्या नावावर १९ शतके, ४९ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने कसोटीत ४ दुहेरी शतकं केली आहेत. कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या इंग्लंडच्या फलंदाजांमध्ये रूट चौथ्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट कोहलीची विकेट घेण्यासाठी ४ वर्षापासून तरसतोय ‘हा’ इंग्लंडचा गोलंदाज, पाहा कशी राहिली कामगिरी
वेलकम होम ‘बुम बुम’! इंग्लंडविरुद्ध पहिल्यांदाच घरच्या मैदानावर बुमराह खेळणार कसोटी क्रिकेट
चेन्नई कसोटीपुर्वी सचिनचा इंग्लंडला मदतीचा हात, सांगितला भारतीय फलंदाजांना बाद करण्याचा उपाय