इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रुटनं इतिहास रचला आहे. तो पाकिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 50 हून अधिक धावा खेळणारा इंग्लंडचा फलंदाज ठरला. त्याच्याआधी हा विक्रम इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कुकच्या नावे होता. त्यानं पाकिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 16 वेळा 50 हून अधिक धावा केल्या होत्या. मुलतानमध्ये 50 धावा करताच रुटनं कुकचा विक्रम मोडला.
कसोटीमध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक वेळा 50 पेक्षा अधिक धावा करणारे इंग्लिश फलंदाज
17 – जो रुट*
16 – ॲलिस्टर कुक
12 – डेव्हिड गोवर
8 – टॉम ग्रेव्हन
या अर्धशतकासह जो रुटनं कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा महान क्रिकेटपटू राहुल द्रविडच्या एका विशेष विक्रमाची बरोबरी केली. द्रविडनं कसोटी क्रिकेटमध्ये 99 वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. या अर्धशतकासह रुटनं देखील कसोटी क्रिकेटमध्ये 99 वेळा 50 पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम नोंदवला. या लिस्टमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर येतो. त्यानं कसोटीमध्ये 119 वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 50 पेक्षा अधिक धावा करणारे फलंदाज
सचिन तेंडुलकर – 119
जॅक कॅलिस – 103
रिकी पाँटिंग – 103
जो रुट* – 99
राहुल द्रविड – 99
जो रुट आता पाकिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा इंग्लंडचा दुसरा फलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्यानं माजी क्रिकेटपटू डेव्हिड गोवरला मागे टाकलं. गोवरनं पाकिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 1185 धावा केल्या होत्या. रुटनं हा विक्रम मोडला आहे.
पाकिस्तानविरुद्ध कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणारे इंग्लिश क्रिकेटपटू
ॲलिस्टर कुक – 1719
जो रुट – 1186*
डेव्हिड गोवर – 1185
ॲलेक स्टीवर्ट – 994
हेही वाचा –
ॲलिस्टर कुकला मागे टाकत, जो रूट आता टाॅपवर; इंग्लंडसाठी अशी कामगिरी करणारा इतिहासात पहिलाचं
मोहम्मद शमीचं पुनरागमन लांबलं?, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का!
हा खेळाडू बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खळबळ माजवणार; शेन वॉटसनची मोठी भविष्यवाणी