इंग्लंडचा कर्णधार जो रुट सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड संघात चालू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने दमदार फलंदाजी केली आहे. सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर शतक तर दुसऱ्या दिवसाखेर त्याने द्विशतक केले. यासह ब्रेंडन मॅक्यूलम, सर डॉन ब्रॅडमन अशा दिग्गजांचे मोठमोठे विक्रम त्याने मोडले. परंतु भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचा एक विक्रम तो मोडू शकला नाही.
चेन्नईतील धोनीचा विक्रम अबाधित
रुटने पहिल्या दिवसापासून बचावात्मक पण आक्रमक फलंदाजी करताना दुसऱ्या दिवसातील तिसऱ्या सत्रापर्यंत द्विशतकाला गवसणी घातली. ३७७ चेंडूंचा सामना करताना त्याने २१८ धावा केल्या. यादरम्यान त्याने २ षटकार आणि १९ चौकार मारले.
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर कसोटीत कर्णधाराच्या रुपात सर्वोच्च वैयक्तिक खेळी करण्याचा शानदार विक्रम धोनीच्या नावावर आहे. २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २२४ धावा करत त्याने या विक्रमाची नोंद केली होती. जेव्हा रुटने द्विशतक पूर्ण केले, तेव्हा धोनीचा हा विक्रम मोडेल असे सर्वांना वाटत होते. परंतु भारताचा डावखुरा फिरकीपटू शाहबाज नदीमने २१८ धावांवर रुटला पायचित केले. त्यामुळे धोनीचा ८ वर्षांपुर्वीचा हा विक्रम अबाधित राहिला.
चेन्नईत सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारे भारतीय फलंदाज
चेपॉक स्टेडियमवर कसोटीत भारताकडून सर्वोच्च वैयक्तिक खेळी करण्याचा विक्रम माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. २००८ मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध याच मैदानावर त्याने ३१९ धावांची आतिशी खेळी केली होती. तसेच करुण नायर याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध नाबाद ३०३ धावांची तडाखेबंद खेळी केली होती. तसेच लिटल मास्टर सुनिल गावसकर यांनी २३६ धावा करत या विक्रमाच्या यादीत तिसरे स्थान पटकावले होते. फलंदाजाच्या रुपात धोनी या विक्रमाच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आता सुरू होणार इंग्लंडची खरी परिक्षा, ‘या’ घातक गोलंदाजाचं होतंय भारतीय संघात पुनरागमन