भारत आणि इंग्लंड दरम्यान झालेली दुसरी कसोटी ही इंग्लिश खेळाडूंच्या स्लेजिंगमुळे चर्चेत राहिली. या सगळ्या प्रकरणाचा इंग्लंडचा कर्णधार जो रूट वर निर्णय घेताना काही परिणाम झाले का? बऱ्याच विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार हा सामना भारतीय खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीबरोबर इंग्लडच्या काही चुकीच्या निर्णयामुळे यजमानांनी हा सामना गमवलाय. सामना हरल्यामुळे ब्रिटिश विश्लेषक आपल्या संघाला दोष देत आहेत. जाणून घेऊ या अशा कोणत्या चुका इंग्लंडचा कर्णधार जो रूटकडून झाल्या ज्यामुळे इंग्लंडला सामना गमवावा लागला.
पाचव्या दिवशीचे पहिले सत्र
पाचव्या दिवशी रिषभ पंतची विकेट गेल्यानंतर जो रूट खूप निवांत झाला होता. याच दरम्यान भारताच्या तळाच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी करत धावा केल्या. ओली रॉबिन्सनने थोडी चांगली गोलंदाजी केली, नाही तर सुरुवातीला फक्त 2 टक्के चेंडू फुल लेंथ टाकले होते. विकेट घेण्यापेक्षा फलंदाजांना डिवचण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे फळ भोगावे लागतात आणि हेच ब्रिटिश संघासोबत झाले. रूटने चांगली फलंदाजी केली, पण कर्णधार म्हणून तो कमी पडला. त्याने अँडरसनलाही खूप उशिरा गोलंदाजी करण्यासाठी आणले.
चौथा दिवसाचे अंतिम सत्र
जेव्हा चौथ्या दिवसाचे अंतिम सत्र चालू होते, तेव्हा भारतीय फलंदाजांनी पंचांकडे खराब प्रकाशाबद्दल तक्रार केली. हा तो काळ होता जेव्हा मोईन अलीचा चेंडू अतिशय वेगाने फिरत होता आणि भारतीय फलंदाजांना त्याच्या फिरकीमध्ये अडकवत होता. तरी देखील जो रूटने वेगवान गोलंदाजांना गोलंदाजीसाठी आणले होते, ज्यामुळे पंचांना चौथ्या दिवसाचा खेळ थांबवावा लागला. जर रूटने गोलंदाजीसाठी फिरकीपटू आणले असते तर इंग्लंडला खूप फायदा झाला असता.
तिसऱ्या दिवसाचे अंतिम सत्र
रूटने तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रातही चूक केली. त्याने जेम्स अँडरसनला शेवटच्या षटकातील दोन चेंडू खेळण्यासाठी पाठवले. रूट शेवटचे षटक खेचून दुसऱ्या दिवशी नव्याने सुरुवात करू शकला असता आणि इंग्लंडला आणखी थोडी आघाडी घेता आली असती, पण रुटने तसे केले नाही.
तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या षटकात रूटने तीन चेंडू खेळले पण चौथ्या चेंडूवर एक धाव घेऊन अँडरसनला स्ट्राईक दिला. जेम्स अँडरसनला भारतीय गोलंदाजांनी आधीच अडचणीत आणले होते, कारण त्याला आधीच्या षटकात चेंडू हेल्मेटवर लागला होता. त्यामुळे त्याला स्ट्राइक घ्यायचा नव्हता, पण रूटने त्यास स्ट्राइक दिला आणि अँडरसन बाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
लॉर्ड्स मोहिम फत्ते करणाऱ्या सर्व ११ शिलेदारांच्या प्रतिक्रिया, वाचा सविस्तर
“अफगाणिस्तानकडे मोदींसारखा नेता नव्हता”, राष्ट्रकुल विजेत्या बबिता फोगटची प्रतिक्रिया






