---Advertisement---

विजयाचा आनंद! लॉर्ड्स कसोटीत विजय मिळवल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये भारतीय संघाने ‘असा’ साजरा केला जल्लोष

On: मंगळवार, ऑगस्ट 17, 2021 3:55 PM
---Advertisement---

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघामध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत,इंग्लंड संघाला १५१ धावांनी पराभूत केले. यासह या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने जोरदार जल्लोष साजरा केला.

विजयानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममधील जल्लोषाचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत वेबसाईटवर शेअर केला असून या व्हिडिओची छोटी झलक सोशल मीडियावर देखील शेअर करण्यात आली आहे.

भारतीय संघातील गोलंदाजांनी या सामन्यात विजय मिळवण्यात मोलाचे योगदान दिले. भारतीय संघ अडचणीत असताना मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी मिळून ८९ धावांची भागीदारी केली. त्यानंतर गोलंदाजी करताना देखील त्यांनी इंग्लडच्या फलंदाजांना एकापाठोपाठ एक माघारी धाडले. हा विजय मिळवून जेव्हा भारतीय संघातील खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये परतले होते. त्यावेळी खेळाडूंचा उत्साह पाहण्यासारखा होता. दुसऱ्या डावात ४ गडी बाद करणारा मोहम्मद सिराज डान्स करताना दिसून आला तर, विराट कोहली जोरदार ओरडताना दिसून आला होता.

हा सामना झाल्यानंतर विराट कोहलीने म्हटले की,”या विजयापेक्षा आणखी मोठे काही असूच शकत नाही. कारण संपूर्ण संघाने जी कामगिरी केली ती अविश्वसनीय होती.” तर केएल राहुलने म्हटले की,”२०१८ मध्ये भारतीय संघाला लॉर्ड्स कसोटीमध्ये तिसऱ्या दिवशीच पराभवाचा सामना करावा लागला होता. ते संपूर्ण संघासाठी लज्जास्पद होते.”(Indian team celebrated their victory in dressing room,watch video)

भारतीय संघाने १५१ धावांनी मिळवला विजय 
या सामन्यात इंग्लंड संघाला विजय मिळवण्यासाठी २७२ धावांची आवश्यकता होती. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे फलंदाज लवकर माघारी परलते होते. त्यानंतर कर्णधार रूटने एकहाती झुंज देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला देखील मोठी खेळ खेळता आली नाही. तो अवघ्या ३३ धावा करत माघारी परतला.

त्यानंतर जोस बटलरने शेवटी २५ धावांची खेळी केली. परंतु, त्याला देखील हा सामना वाचवता आला नाही. अखेर भारतीय गोलंदाजांच्या आक्रमक गोलंदाजी समोर इंग्लिश फलंदाजांचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. हा सामना भारतीय संघाने १५१ धावांनी आपल्या नावावर केला.

महत्त्वाच्या बातम्या –

“अफगाणिस्तानकडे मोदींसारखा नेता नव्हता”, राष्ट्रकुल विजेत्या बबिता फोगटची प्रतिक्रिया

तीन वर्षांपूर्वी भारतासाठी डोकेदुखी ठरलेला सॅम करन यंदा फेल; ‘हा’ नकोसा विक्रम करणारा बनला चौथाच इंग्लिश खेळाडू

तालिबानमुळे क्रिकेटला बसणार फटका? अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डच्या अधिकाऱ्याने दिले उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---