ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकासाठी इंग्लंडने 15 जणांचा संघ जाहीर केला आहे. ख्रिस वोक्स आणि मार्क वूड दुखापतीनंतर संघात पुनरागमन करू शकले आहेत. आगामी मेगा स्पर्धेसाठी ईसीबीने मजबूत संघ निवडला आहे. हे दोन्ही वेगवान गोलंदाज शेवटचे वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान इंग्लंडकडून खेळताना दिसले होते. टी-२० विश्वचषकात जॉस बटलर संघाचे नेतृत्व करणार आहे.
जोफ्रा आर्चर याला विश्वचषक संघात स्थान मिळाले नाही
वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला टी-20 विश्वचषक संघात स्थान मिळालेले नाही. दुखापतीमुळे तो बराच काळ संघाबाहेर आहे. त्यामुळे अद्याप त्याची परिस्थिती नाजूक असल्याने त्याला संघात स्थान देण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे जोफ्रा आर्चर गेल्या वर्षी झालेल्या 2021 टी-20 विशेवचषकात देखील इंग्लंडच्या संघाचा भाग नव्हता. त्यामुळे तो आगामी 2023 वनडे विश्वचषकात संघात पुनरागमन करेल अशी आशा बाळगली जात आहे.
फिल सॉल्ट सध्या द हंड्रेडमध्ये चमकदार कामगिरी करत आहे
सध्या सुरू असलेल्या द हंड्रेड या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे सॉल्टची निवड करण्यात आली आहे. त्याने आठ सामन्यांमध्ये 44.71 च्या सरासरीने 313 धावा केल्या आहेत आणि स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे.
बटलर प्रथमच आयसीसी स्पर्धेत कर्णधार होणार आहे
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर प्रथमच आयसीसी स्पर्धेत इंग्लंडचे नेतृत्व करताना दिसणार आहे. इऑन मॉर्गनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, बटलरची मर्यादित षटकांच्या फॉर्मेटमध्ये संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याच्या नेतृत्वाखाली पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये संघाला म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही.
टी-20 विश्वचषकासाठी इंग्लंड संघ:
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रुक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘बाऊंड्री लाईनवर उडता कायरन पाहिलात का?’ पोलार्डने घेतलेला अप्रतिम झेल एकदा बघाच
सुपर-4मध्ये पोहोचल्यानंतर दुबईच्या बीचवर भारतीय संघाची मस्ती, विराटच्या सिक्स पॅक्सवर चाहते फिदा
केएल राहुलला हटवून ‘या’ खेळाडूंना केले जाऊ शकते उपकर्णधार, टी20 संघातूनही होणार बाहेर?