लंडन। इंग्लंड क्रिकेट संघासाठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने श्रीलंका दौऱ्यावरील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या वर्कलोड व्यवस्थापनामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या इंग्लंडच्या संघात आर्चरचा समावेश केला नाही. मात्र, असे असले तरीही पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये भारताविरुद्ध होणाऱ्या मालिकेत स्टोक्स आणि आर्चरचे पुनरागमन जवळपास निश्चित आहे.
इंग्लंड संघ २ जानेवारीला श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. तिथे त्यांना गाले स्टेडिअममध्ये १४ ते १८ जानेवारी यादरम्यान पहिला कसोटी सामना खेळायचा आहे. त्यानंतर दुसरा कसोटी सामना २२ ते २६ जानेवारीदरम्यान खेळायचा आहे.
कोरोना व्हायरसमुळे या मालिकेचे आयोजन जैव- सुरक्षित वातावरणात होईल. जिथे प्रेक्षकांना स्टेडिअममध्ये येण्यास परवानगी नसेल.
इंग्लंडचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टोचे पुनरागमन झाले आहे, तर जॉस बटलर आणि बेन फॉक्स यांच्या रूपात आणखी २ यष्टीरक्षक आधीपासूनच संघात आहेत. संघात एसेक्सचा युवा खेळाडू डॅन लॉरेन्स हा एकमेक नवीन खेळाडू आहे. त्याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ७४ सामन्यांचा अनुभव आहे.
इंग्लंड संघ-
जो रूट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जोनाथन बेयरस्टो, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, जॉस बटलर, जॅक क्राउले, सॅम करन, बेन फॉक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, डॉम सिब्ले, ऑली स्टोन, ख्रिस वोक्स, मार्क वुड
महत्त्वाच्या बातम्या-
हम खुद के फेवरेट है.! ऐतिहासिक खेळीनंतर बुमराहचं स्वतःसाठी खास ट्विट
“…तर भारतीय संघाच्या अडचणीत वाढ होईल”, अनिल कुंबळे यांची भविष्यवाणी