सध्याच्या घडीला स्टार वेगवान गोलंदादांमध्ये जोफ्रा आर्चरचे देखील नाव घेतले जाते. नुकतेच त्याने दुखापतीनंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले आहे. पुनरागमन करताच त्याने केवळ गोलंदाजीत नाही तर फलंदाजातही आपला जलवा दाखवला आहे. आर्चर मार्चपासून दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर होता. त्याने आयपीएल २०२१ हंगामातूनही माघार घेतली होती. हा हंगाम सध्या स्थगित करण्यात आला आहे.
सध्या इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेटचा हंगाम सुरु आहे. यादरम्यान, जोफ्रा आर्चरने ससेक्स सेकंड इलेव्हन संघाकडून सरे सेकंड इलेव्हन संघाविरुद्ध क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. यावेळी फलंदाजी करताना त्याने चौकार षटकारांची बरसात केली. त्याच्या फटकेबाजीचा व्हिडिओ ससेक्स क्रिकेटने आपल्या ट्विटर हँडेलवर शेअर केला आहे.
त्याने सरे विरुद्ध सामन्याच्या पहिल्या दिवशी फलंदाजी करताना ३ चौकार आणि २ षटकारांसह ४६ चेंडूत ३५ धावांची छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केली.
Great to have you back, @JofraArcher! 😏
Three fours and two sixes helped Jof score 35 off 46 balls for our second XI against Surrey today 💥 pic.twitter.com/XngjjbZHae
— Sussex Cricket (@SussexCCC) May 4, 2021
फलंदाजीत जरी कमाल केली असली तरी आर्चरला गोलंदाजी करताना खास कामगिरी करता आली नाही. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पावसाचा व्यत्यय आला. पण पावसामुळे खेळ थांबण्यापूर्वी सरेने ससेक्सच्या ४८७ धावसंख्याच्या प्रतिउत्तरादाखल ३ बाद २१५ धावा केल्या होत्या. यावेळी आर्चरने ११ षटके गोलंदाजी करताना ३२ धावा दिल्या. मात्र, त्याला विकेट घेण्यात अपयश आले.
आर्चरवर झाली होती शस्त्रक्रिया
या सामन्याआधी काही महिन्यांपूर्वी घराची साफसफाई करताना आर्चरच्या हातात काचेचा तुकडा घुसला होता. तसेच त्याची हाताच्या कोपऱ्याची दुखापतही वाढली होती. त्यावर त्याला उपचार करण्याची गरज पडली. त्यामुळे तो भारत दौरा देखील अर्धवट सोडून मायदेशी परतला होता. त्याने भारताविरुद्ध या दुखापतीमुळे केवळ २ कसोटी आणि ५ टी२० सामने खेळले होते. यामध्ये त्याला केवळ ११ विकेट्स घेण्यात यश आले होते.
अखेर त्याची दुखापत वाढताना पाहून त्याच्या हातावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर तो इंग्लंडला परतला तसेच त्याने दुखापतीमुळे आयपीएलमध्येही न खेळण्याचा निर्णय घेतला.
महत्त्वाच्या बातम्या –
रैनाची एक बाजू अशीही!! ‘मिस्टर आयपीएल’ बनला कूक, व्हिडिओ तुफान व्हायरल
‘आले.. आर्याचे बाबा आले,’ आयपीएल वारीनंतर अजिंक्य रहाणे पोहोचला घरी; पत्नीने अशी दिली माहिती
कठोर परिश्रमाचे मिळणार फळ! कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी ‘या’ युवा खेळाडूंना मिळणार संधी?