आयपीएल 2023 आपल्या अखेरीकडे चालली असतानाच पुनरागमन करू पाहणाऱ्या मुंबई इंडियन्सला एक तगडा झटका बसला आहे. संघाच्या गोलंदाज विभागाचा हुकमी एक्का म्हटला जाणारा जोफ्रा आर्चर माघारी परतला असून, आता तो उर्वरित हंगामात दिसणार नाही. त्याच्या जागी त्याचाच देशबंधू ख्रिस जॉर्डन हा मुंबईच्या वेगवान माऱ्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेईल. असे असले तरी मोठ्या अपेक्षेने संघात सामील करून घेतलेल्या आर्चरचे जाणे मुंबई इंडियन्सला हंगामाच्या बिजनेस एंडमध्ये हानिकारकच ठरणार आहे.
आयपीएल 2022 चा लिलाव, मेगा लिलाव असल्याने सर्वच संघ पुढील पाच-सहा वर्षांसाठी आपल्या संघाची बांधणी करण्यास प्राधान्य देत होते. त्यावेळी मुंबई इंडियन्सने मोठी रिस्क घेऊन जोफ्रा आर्चरला आपल्या ताफ्यात सामील करून घेतलेले. त्यावेळी आर्चर दुखापतग्रस्त होता. आपण हा हंगाम खेळणार नसल्याचे त्याने आधीच जाहीर केलेले. अशा परिस्थितीतही मुंबईने भविष्याचा विचार करून त्याला आपल्याकडे खेचले. त्यासाठी त्यांनी किंमत मोजली होती तब्बल 8 कोटी. जसप्रीत बुमराह व आर्चर हे जगातील सध्याच्या घडीचे दोन सर्वोत्तम वेगवान गोलंदाज संघात असल्याने पुढील हंगामात आपल्याला याचा फायदा होईल अशी मुंबईला अपेक्षा होती.
मुंबई टीम मॅनेजमेंट, संघमालक आणि कर्णधार यांनी ठेवलेल्या या सर्व अपेक्षांचा आयपीएलमध्ये चुराडा झाला. कारण, जसप्रीत बुमराह या आयपीएलमध्ये खेळणार नसल्याने यावेळी फक्त आर्चरच मुंबईच्या गोलंदाजीची धुरा वाहिल असे सर्वांना वाटले होते. मात्र, विराट कोहलीने पहिल्याच सामन्यात या अपेक्षांवर देखील पाणी फेरले. विराटने आर्चरलाच असे काही फटके मारले की, तो एखादा नेट बॉलर वाटावा.
त्यानंतर मात्र मुंबईची चिंता वाढली कारण, ज्या दुखापतीमुळे आर्चर दोन वर्ष मैदानाबाहेर होता, त्या दुखापतीने डोके वर काढले. चालू हंगामात आर्चर बेल्जियमला पोहोचला. महत्त्वाचे अनेक सामने तो खेळू शकला नाही. पुन्हा आला तेव्हा धार राहिली नव्हती. आता आर्चर माघारी परतला आहे. ते देखील आपल्या मागे हंगामातील खराब आकडेवारी ठेवून. पाच सामने खेळून 20 षटके टाकताना त्याने तब्बल 190 धावा लुटवल्या. सरासरी 95 ची आणि इकॉनॉमी रेट 9.50. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खात्यात बळी अवघे दोन.
आयपीएलमधील त्याच्या कमाईचीच थोडीफार बेरीज वजाबाकी मांडली तर दिसून येते की, आर्चरचा एक बळी मुंबईला आत्तापर्यंत 1.50 कोटींना पडला आहे. मागील वर्षी तो पूर्ण हंगाम न खेळल्याने त्याला कोणतीही रक्कम दिली गेली नव्हती. यावेळी पाच सामने खेळला असला तरी त्याला प्रो राटा नियमानुसार रक्कम देणे फ्रेंचाईजीला भाग पडते. या नियमानुसार विदेशी खेळाडूंना त्यांनी खेळलेल्या सामन्यांची मॅच फीस दिली जाते. आर्चरला कमीत कमी 14 सामने खेळण्यासाठी 8 कोटी रुपये मिळणार होते. मात्र, तो केवळ 5 सामने खेळून माघारी जात असल्याने, त्याला या सामन्यांची मॅच फी 3 कोटी इतकी मिळेल. म्हणजेच त्याचा एक बळी मुंबईला दीड कोटींना पडला.
आपल्या बिजनेस माईंडकरता ओळखल्या जाणाऱ्या अंबानी कुटुंबासाठी हा सौदा मात्र आत्तापर्यंत नुकसानाचाच राहिला आहे हे मात्र नक्की!
(Jofra Archer Ruled Out From IPL 2023 It’s Major Loss For Mumbai Indians As Player And Financially Also)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
“आपले खेळाडू वॉर्नरला घाबरतात”, दिग्गजाचा इंग्लंड संघाला घरचा आहेर
BREAKING: जोफ्रा आर्चर आयपीएलमधून आऊट! ‘हा’ टी20 दिग्गज मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील