जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा सोळावा हंगाम मार्च महिन्याच्या अखेरीस सुरू होत आहे. आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्साठी आयपीएल सुरू होण्याच्या महिनाभर आधीच एक खुशखबरी आली. मागील वर्षी दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाला मुकलेला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर या संपूर्ण हंगामाला उपस्थित राहणार आहे. त्याने स्वतः याबाबत माहिती दिली.
मुंबई संघाने मागच्या आयपीएल हंगामात दुखापग्रस्त जोफ्रा आर्चरला देखील खरेदी केले. आर्चर मागच्या आयपीएल हंगामात खेळणार नव्हता, तरी मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने 8 कोटी रुपये खर्च करून त्याला ताफ्यात सामील केले. मुंबईने भविष्याचा विचार करत त्याच्यावर ही बोली लावली होती. आता आर्चर पूर्णपणे तंदुरुस्त असून, तो संपूर्ण आयपीएल हंगाम खेळणार असल्याचे सांगितले जात आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने देखील त्याला अनुमती दिली असून, केवळ त्याचे वर्कलोड मॅनेजमेंट मुंबई फ्रेंचाईजीला करावे लागेल.
जवळपास दोन वर्ष क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर जानेवारी महिन्यात त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून आंतरराष्ट्रीय पुनरागमन केले होते. तसेच, एसए टी20 लीगमध्ये तो मुंबई इंडियन्सच्या मालकीच्या असलेल्या एमआय केपटाऊन संघाचा देखील भाग होता. आर्चर मुंबईसाठी पूर्ण हंगामात उपलब्ध असल्याने मुंबईची ताकद वाढणार आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत तो मुंबईच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करेल.
आर्चरने आयपीएल कारकीर्दीत आतापर्यंत 35 सामन्यांमध्ये 46 विकेट्स घेतल्या आहेत. यापूर्वी त्याने राजस्थान रॉयल्सचे तीन हंगामात प्रतिनिधित्व केले होते. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर आर्चरने 13 कसोटी सामन्यांमध्ये 42 विकेट्स घेतल्या आहेत. वनडेमध्ये त्याने 20, तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12 सामने खेळले आहेत. वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर अनुक्रमे 39 आणि 14 विकेट्सची नोंद आहे.
(Jofra Archer Will Available For Mumbai Indians In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: लग्नाच्या बेडीत अडकलेल्या शार्दुलचा पत्नीसाठी झक्कास उखाणा; म्हणाला, ‘बॉलिंग करतो क्वीक…’
थेट ‘सिक्सर किंग’ युवीला पछाडत उमेश ‘स्पेशल’ यादीत! रवी शास्त्रींचा पराक्रमही ध्वस्त