इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) जवळपास 4 वर्षांनंतर पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटमध्ये खेळताना दिसत आहे, त्याला सतत दुखापतींचा सामना करावा लागला. आता त्याच्या पुनरागमनंतर सामन्यात इंग्लंड संघ आणि चाहत्यांना त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. पहिल्याच षटकात आर्चरने विकेट घेत आपली पुनरागमनातील कामगिरी खास बनवली. यासोबतच एका बाबतीत त्याने भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही (Jasprit Bumrah) मागे टाकले आहे. इंग्लंड संघाला आर्चरकडून मोठ्या आशा आहेत.
जवळपास 4 वर्षांनंतर कसोटी क्रिकेट खेळत असलेल्या जोफ्रा आर्चरने पहिल्याच षटकात यशस्वी जयस्वालला (Yashsvi jaiswal) माघारी पाठवले. जयस्वाल चांगल्या फॉर्ममध्ये होता, त्यामुळे त्याची विकेट मिळणे इंग्लंडसाठी फार महत्त्वाचे होते. या मालिकेत फक्त 2 गोलंदाजांनीच 150 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला आहे. पहिला गोलंदाज जोश टंग होता आणि आता दुसरा गोलंदाज जोफ्रा आर्चर ठरला आहे. आर्चरचे आजचे दुसरे षटक या मालिकेत आतापर्यंत 145 किमी प्रतितासपेक्षा जास्त सरासरी वेगाने टाकलेले एकमेव षटक ठरले. यावरून हे स्पष्ट होते की, दुखापतीनंतरही आर्चरचा वेग काही कमी झालेला नाही.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) या मालिकेत त्याच्या 3 डावांमध्ये 2 वेळा 5 विकेट घेतल्या आहेत. पण, वेगाच्या बाबतीत तो मागे राहिला. बुमराह या 3 डावांमध्ये एकदाही 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकला नाही. मोहम्मद सिराज (Mohmmed Siraj & Prasiddh Krishna) आणि प्रसिद्ध कृष्णा हेही या बाबतीत मागेच राहिले. आर्चरच्या वेगामुळे भारतीय फलंदाजांना जपून खेळावे लागेल. या सामन्यात आघाडी मिळवण्यासाठी भारतीय संघाला पहिल्या डावात किमान 450 धावा कराव्या लागतील.






