इंग्लंड क्रिकेट संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर पुन्हा एकदा दुखापतीचा शिकार बनला आहे. दुखापतीच्या कारणास्तव आर्चरने मागच्या मोठा काळात खूपच कमी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आगामी ऍशेस मालिकेतून देखील तो याच कारणास्तव माघार घेत आहे. आर्चरला पुन्हा दुखापत झाल्याचे समजताच इंग्लंडचा प्रमुख वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याच्या डोळ्यांमध्ये पाणी आल्याचे समोर येत आहे.
जोफ्रा आर्चर 2021 नंतर इंग्लंड संघासाठी एकही कसोटी सामना खेळू शकला नाहीये. यावर्षीच्या उन्हाळी हंगामात होणाऱ्या ऍशेस मालिकेत तो इंग्लंडचे प्रतिनिधित्व करेल, अशी अपेक्षा सर्वांनाच होती. मात्र, हे शक्य होऊ शकणार नाही. आर्चरल्या हाताच्या कोपऱ्याला झालेली दुखापत पुन्हा एकदा उद्भवली आहे. इंडियन प्रीमियर लीग 2023साठी मुंबई इंडियन्सने त्याला 8 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. मात्र त्याने संपूर्ण हंगामात फक्त पाच सामने खेळले आहेत. दुखापतीमुळे आर्चरने आयपीएळ हंगाम अर्ध्यात सोडून मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलियन संघासाठी ऍशेस 2019 मध्ये आर्चर सर्वात मोठे आव्हान ठरला होता. या हंगामा आर्चरच्या साथीने स्टुअर्ट ब्रॉड () यानेही मैदान गाजवले होते. ब्रॉडने एका वृत्तमाध्यमासाटी लिलिहेल्या कॉलममध्ये आर्चरच्या दुखापतीविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. ब्रॉडने लिहिले की, “मी बातमी पाहिली की, कोपऱ्याला झालेल्या दुखापतीमुळे जोफ्रा आर्चर मायदेशातील उन्हाळी हंगामात खेळू शकणार नाही. ही बातमी पाहून मी रडणार होतो. आता आर्चरचे पुढचे लक्ष ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या 50 षटकांच्या विश्वचषक पाहिजे. विश्वचषकाआधी तो फिट झाला पाहिजे आणि व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये काम केले पाहिजे.”
दरम्यान, ऍशेस 2019 मध्ये आर्चरने आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा घाम काढला होता. त्याने मालिकेतील चार सामन्यांमध्ये 20.27 च्या सरासरीने 22 विकेट्स घेतल्या होत्या. मालिकेत आर्चरच्या चेंडूमुळे स्टीव स्मिथ राटयर हर्ट झाला होता. आयवर्षीची ऍशेस मालिका इंग्लंडमध्ये खेळळी जाणार असून आर्चर याठिकाणी पुन्हा एकदा भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन करू शकत होता. मात्र, दुखापतीमुळे हे शक्य होणार नाही. (Jofra Archer’s injury brought tears to his eyes, said Stuart Broad)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गोल्डन बॉय नीरज चोप्राने मारली मोठी मजल! बनला जगातील सर्वोत्तम भालाफेकपटू
महाराष्ट्र प्रीमियर लीग । 15 जूनपासून पुण्यात सुरू होणार क्रिकेट सामन्यांचा थरार