इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी पाच वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघाला जोफ्रा आर्चर याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. आर्चर फक्त तीन सामने खेळून मायदेशी परतला आहे. त्याने या हंगामात जितके सामने खेळले, त्यात तो सर्वात महागडा ठरला. त्याला पाहून असे कुठेच वाटले नाही की, तो फलंदाजांना घाम फोडत आहे. यामागील सर्वात मोठे कारण होते त्याचे फिटनेस. तो आयपीएल सुरू होण्यापूर्वी फिट नव्हता. आता तो स्पर्धेतून पूर्णपणे बाहेर पडल्यानंतर या गोष्टीचा खुलासा झाला आहे. अशात भारतीय संघाचे माजी महान खेळाडू सुनील गावसकर यांनी त्याच्यावर आगपाखड केली आहे.
आयपीएल 2023 (IPL 2023) मध्येच सोडून मायदेशी परतलेल्या जोप्रा आर्चर (Jofra Archer) याला भारतात मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी थेट असे म्हटले आहे की, मुंबईने त्याला एकही रुपया देण्याची गरज नाहीये. आर्चरला खडसावत गावसकरांनी तिखट प्रतिक्रिया दिली. ते म्हणालेत की, आर्चरने मुंबईचा विश्वास तोडण्याचं काम केलं आहे.
गावसकरांनी एका स्तंभात लिहिले की, “मुंबई इंडियन्ससाठी जोफ्रा आर्चरचा अनुभव कसा राहिला आहे? त्यांनी हे माहिती असूनही की, तो दुखापतग्रस्त होता आणि फक्त याच हंगामासाठी उपलब्ध असेल, तरीही त्याला खरेदी केली. त्यांनी त्याला मोठी रक्कम दिली आणि त्याबदल्यात त्याने काय दिले? तो 100 टक्के फिट वाटत नव्हता. त्याने याबाबत फ्रँचायझीला माहिती दिली पाहिजे होती. त्यांना तेव्हा समजले, जेव्हा तो आला आणि त्यांना समजले की, त्याला सामान्य गतीने गोलंदाजी करता येत आहे.”
गावसकरांनी पुढे लिहिले की, “स्पर्धेदरम्यान, त्याच्या देशाच्या क्रिकेट बोर्डाने सांगितल्यानुसार तो उपचारासाठी परदेशात गेला. त्यामुळे तो कधीही पूर्णपणे फिट नव्हता. मात्र, तो आयपीएल खेळायला आला. जर तो फ्रँचायझीसाठी प्रतिबद्ध होता, जे कदाचित त्याला ईसीबीपेक्षा जास्त पैसे देत आहेत. खेळत नसूनही त्याने शेवटपर्यंत इथे राहायला पाहिजे होते. मात्र, याव्यतिरिक्त त्याने यूकेला परत जाण्याचा पर्याय निवडला.”
“एक दिवसानंतर एक कहाणी ऐकायला मिळते की, तो जगातील वेगवेगळ्या लीगमध्ये खेळण्यासाठी मुंबई इंडियन्ससोबत कितीतरी मिलियन पाऊंडचा करार करणार आहे. ही सर्वात मोठी लक्ष विचलित करणारे चाल आहे. मुंबई इंडियन्स कोणत्याही भविष्यातील शर्यतीसाठी लंगडणाऱ्या घोड्यावर स्वाक्षरी करणारी मूर्ख फ्रँचायझी नाहीये. कोणतीही चूक करू नका. या घटनेने मुंबई इंडियन्स खुश होणार नाही. तसेच, त्यांनी आता त्याच्या अनुपस्थितीत स्पर्धेत चांगले पुनरागमन केले आहे. अशात आर्चरला आयपीएलसाठी पूर्ण मानधन मिळाले, तर तो भाग्यवान असेल. एका अशा खेळाडूसाठी एक रुपयाही देण्यात काही अर्थ नाहीये, मग ते कितीही मोठे नाव का असेना, जर तो पूर्ण स्पर्धेसाठी उपलब्ध राहणार नसले. ही खेळाडूची आवड आहे की, त्याला आयपीएल फ्रँचायझी किंवा त्यांच्याकडून खेळायला आवडेल. जर तो आयपीएलव्यतिरिक्त देशाला निवडत असेल, तर त्याला पूर्ण गुण मिळतात. मात्र, तो आयपीएल निवडत असेल, तर त्याने त्याला त्याच्या वचनबद्धता पूर्ण करावे लागेल आणि कोणतेही कारण दिले नाही पाहिजे. खासकरून त्यावेळी जेव्हा प्ले-ऑफमधये क्वालिफाय करे महत्त्वपूर्ण असते,” असेही गावसकरांनी पुढे लिहिले.
गावसकरांचा हा स्तंभ सध्या सर्वत्र चर्चेत आहे. आयपीएल 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघ 13पैकी 7 सामन्यात विजय मिळवून पाचव्या स्थानी आहे. मुंबईचा पुढील सामना 21 मे रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. या सामन्यात मुंबई संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (legend sunil gavaskar slams jofra archer for leaving ipl in mid way for mumbai indians)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दारुण पराभवानंतर खचून गेला SRHचा हेड कोच; म्हणाला, ‘आमचे खेळाडू चांगले खेळले, पण विराटने…’
विराटचे कौतुक कराच पण प्लेसिसचे योगदान विसरु नका! नेतृत्वासह फलंदाजीची वाहतोय धुरा