रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने गुरुवारी (दि. 18 मे) सनरायझर्स हैदराबाद संघाला 8 विकेट्सने पराभूत केले. आयपीएल 2023चा 65वा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर खेळला गेला. या सामन्यात हैदराबाद संघाने चांगले प्रदर्शन केले. मात्र, अखेरीस त्यांना सामना गमवावा लागला. या पराभवानंतर हैदराबाद संघाचा मुख्य प्रशिक्षक ब्रायन लारा याने मान्य केले की, विराट कोहली याने त्याच्या संघाविरुद्ध सर्वोत्तम प्रदर्शन केले. मात्र, तो असेही म्हणाला की, हे सांगणे कठीण आहे की, त्यांचा संघ घरच्या मैदानावर सातपैकी सहा सामना कसा काय हारला. यामुळे त्यांची प्ले-ऑफमध्ये जाण्याची शक्यताही संपुष्टात आली.
आधीच प्ले-ऑफमधून बाहेर झालेल्या सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने हेन्रीच क्लासेन (Heirich Klaasen) याच्या शानदार शतकाच्या जोरावर 5 विकेट्स गमावत 186 धावा केल्या होत्या. मात्र, विराट कोहली (Virat Kohli) याच्या 63 चेंडूतील 100 धावा आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याच्या 71 धावांच्या जोरावर दोघांनी पहिल्या विकेटसाठी 172 धावांची भागीदारी रचली. यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाने 8 विकेट्सने सामना खिशात घातला. तसेच, क्लासेनच्या प्रयत्नांवरही पाणी फेरले.
हैदराबादच्या 13 सामन्यांतील नवव्या पराभवानंतर ब्रायन लारा (Brian Lara) याने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तो म्हणाला की, “आमच्या खेळाडूंनी चांगला खेळ दाखवला. मात्र, विराट कोहलीने आमच्याविरुद्ध आपले सर्वोत्तम प्रदर्शन केले. फाफ या संपूर्ण हंगामात आरसीबीकडून चांगली भूमिका निभावतोय. त्याच्याकडे अजूनही ऑरेंज कॅप आहे. अशाप्रकारे आमचा सामना दोन जागतिक दर्जाच्या खेळाडूंशी होता. एकूणच माझा विश्वास आहे की, आमच्या खेळाडूंनी चांगला प्रयत्न केला.”
यावेळी संघ घरच्या मैदानावरील 6 सामन्यात पराभूत कसा झाला, हे सांगू शकला नाही. तो म्हणाला की, “इथे बसून हे सांगणे खूपच कठीण आहे. मात्र, आम्ही सातत्याने चांगले प्रदर्शन केले आहे. तरीही आम्हाला अशी अपेक्षा नव्हती की, आम्ही घरच्या मैदानावर सातपैकी एकच सामना जिंकू, पण असे झाले.”
हैदराबाद संघ 13 पैकी 4 सामने जिंकून 8 गुणांसह गुणतालिकेत अखेरच्या म्हणजेच दहाव्या स्थानावर आहे. हैदराबादचा अखेरचा सामना 21 मे रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध आहे. या सामन्यात हैदराबाद संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (ipl 2023 srh head coach brian lara on virat kohli and faf du plessis read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटचे कौतुक कराच पण प्लेसिसचे योगदान विसरु नका! नेतृत्वासह फलंदाजीची वाहतोय धुरा
लखनऊने विराटच्या शतकानंतर ट्वीट करत माजवली खळबळ; नेटकरी म्हणाले, ‘आता युद्धासाठी तयार व्हा, गंभीर…’






