---Advertisement---

जोहान्सबर्गचे पहिले पाच ‘सुपरकिंग्स’ जाहीर; दिसतेय ‘मिनी सीएसके’

On: मंगळवार, ऑगस्ट 16, 2022 11:56 PM
CSK
---Advertisement---

पुढील वर्षी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने नवी टी२० लीग सुरू करण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी सहा फ्रॅंचाईजी आयपीएलमधीलच संघांनी विकत घेतल्या आहेत. पुढील महिन्यात या लीगसाठी खेळाडूंचा लिलाव आयोजित केला जाईल. तत्पूर्वी, प्रत्येक फ्रॅंचायजीला प्रत्येकी पाच खेळाडू करारबद्ध करण्याची परवानगी देण्यात आली आहे. एमआय केपटाऊन, डर्बन, प्रिटोरिया कॅपिटल्स व पार्ल रॉयल्स या संघाने आपल्या खेळाडूंची नावे अधिकृतरित्या घोषित केली आहेत. त्यानंतर आता जोहान्सबर्ग फ्रॅंचायजीनेही आपल्या पाच खेळाडूंची नावे अंतिम केल्याचे वृत्त समोर येत आहे.

जोहान्सबर्ग फ्रॅंचाईजी ही आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्सच्या मालकीची फ्रेंचायजी आहे. या संघाचे नाव जोहान्सबर्ग सुपरकिंग्स असे होण्याची शक्यता आहे. माध्यमातील वृत्तानुसार, जोहान्सबर्ग फ्रॅंचायजीने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस, इंग्लंडचा मोईन अली, श्रीलंकेचा महिश तिक्षणा, वेस्ट इंडिजचा रोमारियो शेफर्ड व दक्षिण आफ्रिकेचा युवा अष्टपैलू गेराल्ड कोएत्झे यांना करारबद्ध केले आहे.

प्लेसिस हा अनेक वर्ष चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य होता. तर अली व तिक्षणा हे सध्या चेन्नईसाठी खेळतात. प्लेसिस या संघाचा कर्णधार असू शकतो. तर, चेन्नईचा मुख्य प्रशिक्षक असलेला स्टीफन फ्लेमिंग हाच संघाचा प्रशिक्षक राहील. दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू एल्बी मॉर्केल हा संघाचा मेंटर असेल. २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावात जोहान्सबर्गकडे ८.५ कोटी रुपये शिल्लक असतील.

या नव्या लीगमधील सर्व संघ आयपीएलमधील संघमालकांनीच विकत घेतले आहेत. यात मुंबई, दिल्ली, राजस्थान, चेन्नई, हैदराबाद व लखनऊ यांचा समावेश आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात ही लीग सुरू होईल.

महत्त्वाच्या बातम्या-

रोहित शर्माची एक झलक पाहण्यासाठी लोटला जनसागर, व्हिडिओ होतोयं भन्नाट व्हायरल

भारतीय संघाच्या कामगिरीवर कर्णधार खूष! ‘हा एक चांगला अनुभव होता’ म्हणत थोपटली पाठ

‘त्याच्यावर टीका होतेय, कारण…’ भारताच्या माजी कर्णधाराने केली पंतची पाठराखण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---