भारतीय संघाचा माजी खेळाडू आकाश चोपडाने आयपीएल फ्रंचायझी कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार सौरव गांंगुली आणि माजी प्रशिक्षक जॉन बुकाननबद्दल मोठा खुलासा केला आहे. बुकानन यांना गांगुलीला केकेआरच्या कर्णधारपदावरून हटवायचे होते आणि ते यामध्ये यशस्वीही झाले, असे चोपडाने सांगितले.
आपल्या यूट्यूब चॅनेलवर प्रशिक्षक आणि खेळाडूंच्या नात्याबद्दल चोपडाने (Aakash Chopra) चर्चा केली. यादरम्यान त्याने गांगुली (Sourav Ganguly) आणि बुकानन (John Buchanan) यांचा मुद्दा उपस्थित केला.
तो म्हणाला, “आयपीएल २००८ दरम्यान गांगुली केकेआरचा कर्णधार होता, बुकानन आणि रिकी पाँटिंगदेखील संघाचा भाग होते. मी खूप जवळून पाहिले की सुरुवातीला दोघांचे नाते ठीक होते. तरीही अधिक काळ ते टिकले नाही. कारण दोघांचीही काम करण्याची पद्धत वेगळी होती. शेवटी बुकानन यांना गांगुलीला कर्णधारपदावरून हटवायचे (Removed from captaincy) होते आणि पुढच्या मोसमात अगदी तसंच झालं. पहिल्याच मोसमात संघ सहाव्या क्रमांकावर होता आणि जेव्हा गांगुली कर्णधार नव्हता, तेव्हा पुढील मोसमात संघ थेट आठव्या क्रमांकावर आला.”
पुढे चोपडाने स्पष्ट केले की मोसमानंतर बुकानन यांना प्रशिक्षकपदावरून हटविण्यात आले. त्याने बुकानन यांच्या व्यवस्थापन कौशल्यांवर प्रश्न उपस्थित करत ते नाते खराब होण्याचे मुख्य कारण असल्याचे सांगितले. याव्यतिरिक्त त्याने हेदेखील सांगितले की बुकानन आपल्या मित्रांना आणि कुटुंबाला घेऊन आला, जे चुकीचे होते.
केकेआरसाठी गांगुलीची आकडेवारी नाही राहिली फार खास
गांगुलीने केकेआरसाठी ४० सामने खेळले, ज्यामध्ये २८.६३ च्या सरासरीने आणि ११०.५० च्या स्ट्राईक रेटने १०३१ धावा केल्या. यादरम्यान त्याने ७ अर्धशतकेही ठोकली. त्याची सर्वाधिक धावसंख्या ही ९१ धावा होती. याव्यतिरिक्त गांगुलीने २ मोसमात केकेआरचे नेतृत्व केले आणि दोन्हीही मोसमात संघ उपांत्य सामन्यात स्थान मिळवू शकला नाही.
केकेआरने गांगुलीच्या नेतृत्वात २७ सामन्यांपैकी १३ सामने जिंकले, तर १४ सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या ३ मोसमात खराब कामगिरी केल्यानंतर २०११च्या आयपीएलमध्ये केकेआरने गांगुलीला मुक्त केले होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
–Eng vs WI: पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने घोषित केला संघ: या अनुभवी खेळाडूला दिले नाही स्थान
-मी कर्णधार आहे; मी जे सांगेल ते तुला करावंच लागेल, तू आता इथून निघ आणि तिकडं…