डब्लूडब्लूइचा स्टार जॉन सीनाने त्याच्या इंस्टाग्रामच्या अकांऊटवरून भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडूलकर, गायक दलेर मेंहदी आणि कॉमेडियन कपिल शर्मा यांचे फोटो अपलोड केले आहेत. या फोटोंना कोणतीही माहिती जोडली नसल्याने ते का टाकले यावर प्रश्नचिन्ह आहे.
यामध्ये सचिनच्या निवृत्तीच्या फोटोला दीड लाख लाईक्स, मेंहदी यांनी नारंगी कपड्यातील फोटोला अडीच लाख पेक्षा जास्त लाईक्स तर कपिलच्या थुल्लू स्टाईलच्या फोटोला एक लाखच्या वर लाईक्स मिळाले आहेत.
John Cena posts pictures of Kapil Sharma and Daler Mehndi.
*Read his Bio*
😂🤣😂🤣😂🤣🤣 pic.twitter.com/LQFXxYnZ9O— ami⁷ (@taecandyyy) August 13, 2018
सीनाची ही भारतीय कलाकाराच्या बाबतीत असे करण्याची पहिलीच वेळ नाही. त्याने याआधीही बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानचे ट्विट शेयर केले होते. त्याला शाहरूखने उत्तरही दिले होते.
“Neither power nor poverty can make your life more magical or less torturous” Shah Rukh Khan
— John Cena (@JohnCena) July 9, 2018
“माझे भारतीय चाहते खूप आहेत. जेव्हा मी सोशल मिडियावर असतो तेव्हा सगळ्यांनाच माझ्याशी बोलायचे असते”, असे सीना म्हणाला.
तसेच सीना 2005ला भारतात येऊन गेला आहे. कलाकारही असणाऱ्या सीनाने ब्लॉकर्स या विनोदी चित्रपटात काम केले आहे. तसेच तो ट्रान्सफॉर्मरच्या स्पिनऑफच्या बम्ब्लेबीमध्ये दिसणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–मुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक
–कबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण