जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा पुढील हंगाम 31 मार्चपासून सुरू होणार आहे. स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात अपयशी संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंजाब किंग्स संघाला यावेळी विजयाची अपेक्षा आहे. मात्र, हंगाम सुरू होण्याच्या एक आठवडा आधीच पंजाब संघासाठी काही आनंदाच्या तर काही चिंतेच्या गोष्टी समोर येत आहेत.
पंजाब किंग्स आयपीएलच्या सर्व हंगामात सहभागी होणार संघ आहे. या 15 हंगामात पंजाब केवळ एकदाच अंतिम फेरी गाठू शकला आहे. त्यातही त्यांना पराभव पत्करावा लागला होता. या नव्या हंगामात पंजाब आपले पहिले विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी संघाचे नेतृत्व भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन याच्या खांद्यावर देण्यात आले आहे. पंजाब संघात यावेळी आंतरराष्ट्रीय अनुभव असलेले मोठे विदेशी खेळाडू दिसून येतील. मात्र, यातील हुकमी एक्का मानला जाणारा जॉनी बेअरस्टो स्पर्धेसाठी उपलब्ध नसेल.
एका प्रसिद्ध क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने बेअरस्टो याला आयपीएल खेळण्यास ना हरकत प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. बेअरस्टो मागील वर्षी गोल्फ खेळताना दुखापतग्रस्त झाला होता. त्या दुखापतीतून तो नुकताच सावरला असून त्याला आणखी विश्रांतीची गरज असल्याचे बोर्डाचे म्हणणे आहे.
बेअरस्टो संघाचा भाग नसला तरी पंजाब संघात असलेले इतर दोन इंग्लिश खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोन व सॅम करन हे संपूर्ण हंगाम खेळताना दिसतील. लिव्हिंगस्टोन मागील वर्षापासून संघाचा भाग आहे. तर, करनला यावेळी आयपीएल लिलावात पंजाबने विक्रमी 18.50 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
आयपीएल 2023 साठी पंजाब किंग्स संघ-
शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, अथर्व तायडे, हरप्रीत ब्रार, लियाम लिव्हिंगस्टोन, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, राज अंगद बावा, रिषी धवन, शाहरुख खान, अर्शदीप सिंग, बलतेज धांडा, सॅम करन, सिकंदर रझा, हरप्रीत भाटिया, विद्वथ कवीरप्पा, मोहित राठी, शिवम सिंग, कागिसो रबाडा, नॅथन एलिस, राहुल चहर.
(Johnny Bairstow Not Get NOC From ECB For IPL 2023 Livingston And Curran Available For Entire IPL For Punjab Kings)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 लॉर्ड बनला एमआयचा गुरू! प्रशिक्षक म्हणून पोलार्डने सुरू केली नवीन इनिंग
पराभवाचे कारण सांगताना रोहित म्हणतोय, “वेळापत्रक खूप व्यस्त, विश्रांती मिळत नाही”