---Advertisement---

संघाचा मोठा निर्णय, हा खेळाडूचं असणार 2025 पर्यंत हेड कोच!

On: मंगळवार, डिसेंबर 10, 2024 11:34 AM
---Advertisement---

जोनाथन ट्रॉटच्या प्रशिक्षणाखाली अफगाणिस्तान क्रिकेट संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट संघ 2024 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहोचला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघाला पराभवाचा सामना करावा लागला. आता अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेत जोनाथन ट्रॉटचा कार्यकाळ वाढवला आहे. ते 2025 च्या अखेरीपर्यंत अफगाणिस्तान पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक राहतील.

जुलै 2022 मध्ये जोनाथन ट्रॉट पहिल्यांदा अफगाण क्रिकेट संघाचे प्रशिक्षक बनले. त्यानंतर जानेवारी 2024 मध्ये त्यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवण्यात आला. प्रशिक्षक झाल्यापासून अफगाणिस्तानने 34 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यापैकी 14 जिंकले आहेत. तसेच  44 टी20 पैकी 20 टी20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले. सध्या अफगाणिस्तानला झिम्बाब्वेविरुद्ध तीन टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळायच्या आहेत.

याशिवाय अफगाणिस्तानने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दोन माजी चॅम्पियन्सचा संघाचा पराभव केला होता. ज्यात इंग्लंड आणि पाकिस्तान यांचा समावेश होता. एकदिवसीय विश्वचषकातील दमदार कामगिरीमुळे अफगाणिस्तान 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरला आहे. ज्यामध्ये संघ पहिल्यांदाच खेळताना दिसणार आहे. त्यानंतर 2024 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेतही या संघाने आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केले. यानंतर संघ दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेश विरुद्ध वनडे मालिकेत पराभूत झाले.

जोनाथन ट्रॉटला कोचिंगचा अनुभव आहे. याआधी तो स्कॉटलंड संघाचा सल्लागार होता. ट्रॉटने इंग्लंडकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळले आहे आणि इंग्लंडसाठी 52 कसोटी सामन्यांमध्ये 44.08 च्या सरासरीने 3835 धावा केल्या आहेत. याशिवाय, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 4 शतके आणि 22 अर्धशतकांसह 51.25 च्या सरासरीने 2819 धावा केल्या. दोन्ही फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर एकूण 13 शतके आहेत.

हेही वाचा-

‘तो चांगल्या स्वभावाचा…’, दिग्गज ऑस्ट्रेलियन गोलंदाज मोहम्मद सिराजचा मोठा चाहता
Champions Trophy; “आम्हाला लेखी आश्वासन…”, हायब्रीड मॉडेलसाठी पीसीबीची आयसीसीसमोर आणखी एक अट!
गाबा मैदानावर आतापर्यंत हे 4 भारतीयचं शतक करण्यात यशस्वी, शेवटची सेंच्युरी 10 वर्षापूर्वी आलेली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---