---Advertisement---

जे १५ वर्षात कुणाला जमलं नाही, ते बेअरस्टोने करून दाखवलं! दिग्गज जयसूर्याच्या ‘त्या’ विक्रमाशी केली बरोबरी

Jonny-Bairstow-IPL
---Advertisement---

पंजाब किंग्स संघामध्ये एकापेक्षा एक धाकड फलंदाजांचा भरणा आहे. त्यातीलच एक म्हणजे जॉनी बेअरस्टो होय. शुक्रवारी (दि. १३ मे) आयपीएल २०२२मधील ६०वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स संघात खेळला गेला. या सामन्यात बेअरस्टोच्या अफलातून फलंदाजीचे दर्शन चाहत्यांना घडले. या सामन्यात बेअरस्टोने अर्धशतक तर झळकावलेच, पण सोबतच श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज सनथ जयसूर्याच्या १५ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी केली.

जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) याने या सामन्यात २९ चेंडूत ६६ धावांची जबरदस्त खेळी करत हंगामातील सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले. डावाची सुरुवात करताना बेअरस्टोने २१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. या धावा करताना त्याने ३ चौकार आणि ६ षटकारही मारले होते. पॉवरप्ले संपायच्या आतच सातवा षटकारही मारला.

https://twitter.com/PunjabKingsIPL/status/1525119170718728192

सनथ जयसूर्याच्या १५ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी केली बरोबरी
बेअरस्टोने आयपीएलच्या एका सामन्यातील पॉवरप्लेमध्ये सात षटकार मारल्यामुळे त्याने सनथ जयसूर्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. जयसूर्याने सन २००८ साली मुंबई इंडियन्सकडून खेळताना आयपीएलच्या पहिल्याच हंगामात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध पॉवरप्लेमध्ये ७ षटकार चोपले होते. आता १५ वर्षांनंतर बेअरस्टो जयसूर्याच्या विक्रमाशी बरोबरी करण्यात यशस्वी झाला आहे.

आयपीएल २०२२मध्ये पॉवरप्लेमधील सर्वोच्च वैयक्तिक खेळी
बेअरस्टोने आपल्या या शानदार खेळीदरम्यान आयपीएल २०२२मध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वोच्च वैयक्तिक खेळी करण्याचा विक्रमही नावावर केला. बेंगलोरविरुद्ध त्याने पॉवरप्लेमध्ये ५९ धावा केल्या. यासह त्याने आपल्याच देशाचा खेळाडू जोस बटलरचा विक्रम मोडला. बटलरने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना गुजरात टायटन्सविरुद्ध ५४ धावा केल्या होत्या.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

वेगाने धावा करणारा बेअरस्टो १०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शाहबाज अहमदच्या चेंडूवर मोहम्मद सिराजच्या हातून बाद झाला. यासोबतच त्याच्या डाव संपुष्टात आला. बेअरस्टोने २९ चेंडूत ६६ धावांची वादळी खेळी केली. यादरम्यान त्याने ४ चौकार आणि ७ षटकार मारले. बाद होण्यापूर्वी त्याने पंजाबला ९ षटकात १०० धावा पूर्ण करण्यात मोलाचे योगदान दिले.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

आरसीबीविरुद्ध बेयरस्टोच्या बॅटला लगाम लावणं कठीण! फक्त बाउंड्रीपार चेंडू मारत केलं कारकिर्दीतील जलद अर्धशतक

बेअरस्टोने दाखवली आयपीएलमधील आपली ‘पॉवर’, पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा चोपण्यात बनला ‘टॉपर’

IPL 2022। चेन्नईचा काटा काढल्यानंतर तिलक वर्माने मैदानातच कुणासाठी जोडले हात? घ्या जाणून

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---