---Advertisement---

बेअरस्टोने दाखवली आयपीएलमधील आपली ‘पॉवर’, पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा चोपण्यात बनला ‘टॉपर’

On: शुक्रवार, मे 13, 2022 8:54 PM
Jonny-Bairstow
---Advertisement---

अखेरच्या टप्प्यात पोहोचलेल्या आयपीएल २०२२मधील ६०वा सामना शुक्रवारी (दि. १३ मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स संघात पार पडला. या सामन्यात पंजाबचा धाकड फलंदाज जॉनी बेअरस्टोने या हंगामातील दुसरी सर्वोत्तम खेळी केली. यामुळे त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. चला तर काय आहे तो विक्रम जाणून घेऊया.

मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअम (Brabourne Stadium) येथे पार पडलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी पंजाबकडून जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांनी डावाची सुरुवात केली. यावेळी बेअरस्टोने फलंदाजी करताना कमालच केली.

बेअरस्टोने पॉवरप्लेमध्ये फलंदाजी करताना २२ चेंडू खेळत ५९ धावा चोपल्या. या धावा करत तो आयपीएल २०२२मध्ये पॉवरप्लेमध्ये  सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारणारा फलंदाज ठरला. या यादीत दुसऱ्या स्थानी राजस्थान रॉयल्स संघाचा जोस बटलर आहे. त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध फलंदाजी करताना पॉवरप्लेमध्ये ५४ धावांची खेळी केली होती. बटलरपाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्स संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ आहे. त्याने आयपीएल २०२२मध्ये नव्याने सामील झालेल्या लखनऊ सुपर जायंट्स या संघाविरुद्ध पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक ४७ धावा चोपल्या होत्या. यानंतर चौथ्या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबाद संघाचा फलंदाज अभिषेक शर्मा आहे. त्याने बेंगलोरविरुद्ध पॉवरप्लेमध्ये फलंदाजी करताना ४६ धावा चोपल्या होत्या.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

आयपीएल २०२२मध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावसंख्या उभारणारे फलंदाज
५९ धावा- जॉनी बेअरस्टो (विरुद्ध, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)*
५४ धावा- जोस बटलर (विरुद्ध, गुजरात टायटन्स)
४७ धावा- पृथ्वी शॉ (विरुद्ध, लखनऊ सुपर जायंट्स)
४६ धावा- अभिषेक शर्मा (विरुद्ध, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

IPL 2022। चेन्नईचा काटा काढल्यानंतर तिलक वर्माने मैदानातच कुणासाठी जोडले हात? घ्या जाणून

चमकता चेहरा अन् घायाळ करणारं हसू, जगातील सर्वात श्रीमंत मिस्ट्री गर्ल कॅमेऱ्यात कैद, जाणून घ्या कोण आहे?

शर्माची जागा घेणार वर्मा? लवकरच ‘या’ खेळाडूच्या कपाळावर लागणार मुंबईच्या कर्णधारपदाचा ‘तिलक’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---