---Advertisement---

चमकता चेहरा अन् घायाळ करणारं हसू, जगातील सर्वात श्रीमंत मिस्ट्री गर्ल कॅमेऱ्यात कैद, जाणून घ्या कोण आहे?

On: शुक्रवार, मे 13, 2022 5:09 PM
Shloka-Ambani
---Advertisement---

जगभरात सर्वात चर्चा कोणत्या टी२० लीगची चर्चा होत असेल, तर ती म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग होय. या लीगमध्ये सामने सुरू असताना चाहते नेहमीच व्हायरल होण्यासाठी काही ना काही फंडे वापरत असतात. तसेच, काही लोक काहीही न करता फक्त स्टेडिअममध्ये झळकल्यामुळेही व्हायरल होतात. सध्या आयपीएलचा १५वा हंगाम सुरू आहे. यामध्ये मिस्ट्री गर्लची चांगलीच चर्चा रंगली आहे. गुरुवारी (दि. १२ मे) हंगामातील ५९वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. हा सामना मुंबईने ५ विकेट्सने सामना खिशात घातला. तसेच, चेन्नई संघदेखील प्लेऑफमधून बाहेर पडला. या सामन्यादरम्यानही एका मिस्ट्री गर्लने सर्वांचे लक्ष वेधले. या मिस्ट्री गर्लचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कोण आहे मिस्ट्री गर्ल?
व्हायरल होत असलेली मिस्ट्री गर्ल (Mystery Girl) इतर कुणी नाही, तर मुंबई इंडियन्स (Mumbai Indian) संघाचा मालक आकाश अंबानी (Akash Ambani) याची पत्नी श्लोका अंबानी (Shloka Ambani) ही आहे. चाहत्यांना जगातील सर्वात श्रीमंत मिस्ट्री गर्लचे दर्शन या सामन्यादरम्यान घडले. कॅमेरामनने सामन्यादरम्यान अनेकदा या मिस्ट्री गर्लवर फोकस केल्यामुळे त्याला सोशल मीडियावर जोरदार ट्रोलही करण्यात आले. खरं तर, या महत्त्वाच्या सामन्यासाठी आकाश अंबानी पत्नी श्लोका अंबानीसोबत मैदानात पोहोचला होता. या दोघांनीही आपल्या संघाच्या विजयानंतर आनंद व्यक्त केला. यादरम्यानचे फोटो व्हायरल होत आहेत.

https://twitter.com/Tejashwi_rofl/status/1524789639323656204?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1524789639323656204%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fsports%2Fcricket%2Fiplt20%2Fnews%2Fipl-2022-who-is-this-mystery-girl-photos-goes-viral-csk-vs-mi%2Farticleshow%2F91536974.cms

https://twitter.com/iplcric2022/status/1524788997343842305?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1524788997343842305%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fsports%2Fcricket%2Fiplt20%2Fnews%2Fipl-2022-who-is-this-mystery-girl-photos-goes-viral-csk-vs-mi%2Farticleshow%2F91536974.cms

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

मुंबई इंडियन्सने सामन्यात गोलंदाजी करताना पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाला अवघ्या ९७ धावांवर रोखले. या सामन्यात दोघेही आनंदी दिसले. यानंतर मुंबईने सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना ३३ धावांमध्ये ४ विकेट्स गमावले होते. त्यामुळे आकाश आणि श्लोकाही चिंतेत दिसले. यानंतर शेवटी संघाने विजय मिळवल्यानंतर दोघेही आनंदी दिसले.

Akash-Ambani
Photo Courtesy: iplt20.com

या सामन्यादरम्यान एमएस धोनीच्या एका चाहत्याने सर्वांचे मन जिंकले. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला पाठिंबा देणारा हा चाहता, स्टेडिअममध्ये एक पोस्टर घेऊन पोहोचला होता. यामध्ये लिहिले होते की, “मुंबई माझी जान आहे, पण धोनी देशाची शान आहे.”

सामन्याचा आढावा
या सामन्यात चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी करताना दिलेले ९७ धावांचे आव्हान मुंबईने अवघ्या १४.५ षटकात ५ विकेट्स गमावत पूर्ण केले. यावेळी मुंबईकडून तिलक वर्मा (Tilak Varma) याने नाबाद ३४ धावा केल्या. या धावा करताना त्याने ४ अर्धशतकेही झळकावली.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

चेन्नईविरुद्ध का खेळला नाही कायरन पोलार्ड? मोठे कारण आले समोर

शर्माची जागा घेणार वर्मा? लवकरच ‘या’ खेळाडूच्या कपाळावर लागणार मुंबईच्या कर्णधारपदाचा ‘तिलक’

द्रविडच्या साधेपणाने पुन्हा जिंकली लाखो मने! बुक स्टोअरमधील फोटो होतोय तुफान व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---