जर कोणी आपणास सर्वकालीन महान क्षेत्ररक्षक निवडण्यास सांगितले तर आपण कदाचित जॉन्टी रोड्सचे प्रथम नाव घ्याल. जॉन्टी रोड्स ज्यांनी क्रिकेट विश्वातील क्षेत्ररक्षणाची व्याख्या व प्रमाण बदलले. क्षेत्ररक्षणात सर्व काही करू शकणारा असा खेळाडू ज्याची कल्पना यापूर्वी कोणीही केली नसेल. तो हवेमध्ये सूर मारत क्षेत्ररक्षण करण्यात माहीर होता.
आज (27 जुलै) जॉन्टी रोड्सचा 53 वा वाढदिवस आहे. त्याचे संपूर्ण नाव जोनाथन नील रोड्स आहे, त्याचा जन्म दक्षिण आफ्रिकेच्या नेटल प्रांतात झाला.
जॉन्टी रोड्सने फेब्रुवारी 1992 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जेव्हा मैदानावर हवेत सूर मारून चेंडू अडवायला सुरुवात केली तेव्हा जगाला प्रथम धक्का बसला. क्षेत्ररक्षण पूर्वीही होते आणि चांगले होते परंतु ते वेगळे होते. नोव्हेंबर 1992 मध्ये त्याने भारताविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले. तो आयपीएल टीम मुंबई इंडियन्सचा फील्डिंग कोचही राहिला आहे.
सामना न खेळताच सामनावीरचा पुरस्कार पटकावला
‘मॅन ऑफ द मॅच’साठी त्यांची निवड केली जाते ज्यांनी उत्कृष्ट खेळ दर्शविला आहे. रोड्सला प्रथम श्रेणी सामन्यात मैदानात उतरण्याची संधी मिळाली. पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तो यात अंतिम 11 खेळाडूमध्ये नव्हता. त्याला पर्यायी क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात उतरविण्यात आले. तेथे त्याने अप्रतिम क्षेत्ररक्षण केले आणि सात झेल घेतले. त्यानंतर त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
‘बेस्ट रनआऊट ऑफ ऑल टाइम’
1992 च्या पाकिस्तानविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात इंझमाम-उल-हकला केलेला धावबाद आजही क्रिकेटप्रेमींच्या मनात घर करून आहे.
एका सामन्यात घेतले पाच झेल
जॉन्टीच्या नावावर आणखी एक विश्वविक्रम आहे. ज्याने 1993 च्या सामन्यात 5 झेल घेतला. हा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध मुंबईत खेळला गेला. क्रिकेट इतिहासातील हा विक्रम अजूनही कोणीही मोडला नाही. रोड्सने यष्टिरक्षक म्हणून नव्हे तर क्षेत्ररक्षक म्हणून पाच झेल घेतले.
हॉकीमध्येही केले संघाचे प्रतिनिधीत्व
रोड्सनेही हॉकीमध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले. 1992 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांची संघात निवड झाली होती पण त्याचा संघ पात्र होऊ शकला नाही. त्याने दुखापतीमुळे 1996 च्या चाचण्यांमध्ये भाग घेतला नाही.
आंतरराष्ट्रीय कारकीर्द
जॉन्टी रोड्सने कारकीर्दीत 52 कसोटी आणि 245 वनडे आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. कसोटीत त्याने 3 शतके, 17 अर्धशतकांच्या आधारे 2532 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने वनडे सामन्यात 2 शतके आणि 33 अर्धशतकांसह 5935 धावा केल्या आहेत
भारतावर आहे प्रेम
जॉन्टी रोड्सचे भारतावर प्रेम आहे. त्याच्या मुलीचे नाव ‘इंडिया’ आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsWI Playing XI: भारताची नजर क्लिन स्वीपवर, आवेशच्या जागी ‘या’ गोलंदाजाला दिली जाऊ शकते संधी
पंतने इंस्टाग्राम लाईव्हमध्ये खास व्यक्तिला केले सहभागी, धोनीची एक झलक दिसल्यामुळे व्हिडिओ व्हायरल
रोहितनंतर बुमराह सांभाळेल कसोटी संघाची धुरा, तर वनडे संघाच्या कॅप्टन्सीसाठी ‘हे’ दोघे दावेदार