---Advertisement---

पावसात ग्राउंड स्टाफच्या मदतीनेला धावला जॉन्टी रोड्स, उत्साह पाहून तुम्हीही कराल कौतुक

On: बुधवार, मे 3, 2023 9:08 PM
jonty rhodes helps to ground staff
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी याने बुधवारी (3 मे) नाणेफेक जिंकून लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी घेतली. मैदानात पाऊस आल्याने नाणेफेक अर्धा तास उशिरा झाली, तर सामना सुरू होण्यासाठी 15 मिनिटे उशीर झाला. लखनऊ संघ प्रथम फलंदाजी करताना धावा करण्यासाठी झगडताना दिसला. पण पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने त्यांचा डाव पूर्ण होऊ शकला नाही. यादरम्यान लखनऊचा क्षेत्ररक्षक प्रशिक्षक जॉन्टी रॉड्स याने केलेले एक काम अनेकांना भावले.

लखनऊ सुपर जायंट्सचा नियमित कर्णधार केएल राहुल () मागच्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकला नाही. राहुलच्या अनुपस्थितीत कृणाल पंड्या लखनऊचे नेतृत्व करत होता. कृणालने नाणेफेक गमावल्यानंतर लखनऊ संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आला. पावरप्लेच्या 6 षटकांमध्ये लखनऊने 34 धावा करून 4 महत्वाच्या विकेट्स गमावल्या होत्या. पावरप्लेमध्ये संघाला अपेक्षित सुरुवात मिळाली नाही. पण सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला आयुष बदोनी () याने नाबाद 59 धावा कुटल्या. बदोनीच्या या धमाकेदार खेळीमुळे लखनऊ संघ 19.2 षटकात कसाबसा 125 धावांपर्यंत पोहोचू शकला.

पण डावातील 4 चेंडू शिल्लक असताना पावसाने पुन्हा हजेरी लावला आणि खेळ थांबवावा लागला. खेळडू मैदानातून बाहेर गेल्यानंतर ग्राउंड स्टाफचे सदस्य खेळपट्टी झाकण्यासाठी कामाला लागले. यावेळी लखनऊचा प्रशिभक जॉन्टी रोड्स देखील या कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावसा. रोड्सने ग्राउंड स्टाफच्या कर्मचाऱ्यांसह खेळपट्टी झाकण्यासाठीचा कागद मैदानात ओढला. रोड्सने स्वतःच्या इच्छेने हे काम करत असला, तरी नंतर ग्राउंड स्टाफच्या एका सदस्याने आग्रह केल्यामुळे त्याने बाजूला होण्याचा निर्णय घेतला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहते रोड्सच्या साधेपणासाठी कौतुक करत आहेत.

दरम्यान, जॉन्टी रोड्सचे वय सध्या 53 वर्ष आहे. पण ते आजही एखाद्या युवा खेळाडूला फिटनेसच्या बाबदीत मागे टाकू शकतात. लखनऊचे चालू हंगामातील प्रदर्शन पाहिले, तर संघाने 10 पैकी 5 सामने जिंकले आहेत.  (Jonty Rhodes helps to ground staff to cover the pitch)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गंभीरसोबतच्या वादानंतर विराटला घेऊन देवदर्शनाला गेली अनुष्का, व्हिडिओ व्हायरल
MI vs PBKS । नाणेफेक जिंकून मुंबईचा गोलंदाजीचा निर्णय, पाहा प्लेइंग इलेव्हन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---