fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

३ मुलींबरोबर जाॅंटी रोड्सला झाले होते प्रेम, जिच्याशी लग्न केले ती होती…

Jonty Rhodes Married To His Home Artchitect Malenie Wolf

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी रोड्स याला जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक समजले जाते. त्याने कित्येक वर्षे दमदार प्रदर्शन करत क्रिकेटमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हा क्रिकेटपटू जेवढा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील पराक्रमांमुळे चर्चेत असतो, तेवढाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील किस्स्यांमुळेही चर्चेत येत असतो.

जॉन्टी जेव्हा २४ वर्षांचा होता. तेव्हा त्याने त्याचे पहिले लग्न केले होते. त्याच्या पहिल्या पत्निचे नाव केट मॅककार्थी हे होते. त्यांना २ मुलेही आहेत. परंतु, लग्नाच्या १६ वर्षांनंतर केट आणि जॉन्टीचा घटस्फोट झाला. असे म्हटले जाते की, त्यांचे वेगळे होण्यामागचे कारण हे जॉन्टीची प्रेमिका कॅरोलिन मॅक्लंड ही होती.

जॉन्टी आणि कॅरोलिन यांच्यात कॉलेजपासून मैत्री होती. दोघांचेही वेगवेगळ्या व्यक्तिंसोबत लग्न झाले होते. परंतु, लग्नाच्या काही वर्षांनंतर कॅरोलिनच्या नवऱ्याचा मृत्यू झाल्याने ती आणि जॉन्टी एकमेकांना भेटत असत. त्यामुळे कॉलेजमधील त्यांची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. पहिल्या पत्निसोबतच्या घटस्फोटानंतर २०११मध्ये दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर आल्यानंतर त्याची प्रेमिका कॅरोलिनही सोबत आली होती. त्याने भारतात आल्यानंतर सगळ्यांना सांगितले की, कॅरोलिन माझी प्रेमिका आहे आणि आमचा साखरपुडा झाला आहे.

मात्र, साखरपुड्यानंतर जॉन्टी आणि कॅरोलिन यांनी लग्न केले नाही. झाले असे की, त्यांच्या नवीन घराची आर्किटेक्ट मेलेनी वोल्फ ज्या त्यांच्या घराला सजवण्याचे काम करत होत्या, तिच्याशी जॉन्टीला प्रेम झाले. मेलेनी तिच्या कामाच्या निमित्ताने जॉन्टीला भेटत असायची आणि पुढे त्यांचे प्रेमसंबंधही वाढत गेले. त्यामुळे जॉन्टीने कॅरोलिनला सोडून २०१४मध्ये मेलेनीसोबत लग्न केले.

आता जॉन्टी आणि मेलेनी हे एका मुलीचे आणि एका मुलाचे आई-वडिल आहेत. २०१५मध्ये त्यांना मुलगी झाली, जिचे नाव त्यांनी इंडिया असे ठेवले आहे. तर, २०१७मध्ये त्यांना मुगला झाला. जॉन्टी मेलेनीवरती खूप प्रेम करतो आणि ते दोघेही त्यांच्या जिवनात सुखी आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी-

‘या’ दोन खेळाडूंचे करियर संपल्यात जमा होते, धोनी पॅटर्नने केली कमाल

कसोटीमध्ये द्विशतक झळकावणारे भारतीय खेळाडू; यातील एकाने केलाय ‘हा’ मोठ्ठा विक्रम

हार्दिक पंड्या ‘या’ क्रमांकाची जर्सी घालून का खेळतो? ११ वर्षांनंतर…

You might also like