आयपीएलमध्ये सोमवारी झालेल्या 37 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला 7 गडी राखून पराभूत केले. या सामन्यात राजस्थानचा यष्टीरक्षक फलंदाज जॉस बटलर याने 70 धावांची शानदार खेळी केली. यासोबतच त्याने एक कारनामा केला आहे.
चेन्नईविरुद्ध अर्धशतक ठोकत त्याने आयपीएल कारकिर्दीतील 11 वे अर्धशतक पूर्ण केले. राजस्थानकडून सर्वाधिक अर्धशतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
डावाच्या सुरुवातीला राजस्थान संघ कठीण परिस्थितीत असताना जॉस बटलर आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी चौथ्या गड्यासाठी 98 धावांची भागीदारी करून संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.
अजिंक्य रहाणेने ठोकले सर्वाधिक अर्धशतके
भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने राजस्थानकडून सर्वाधिक 17 अर्धशतके ठोकली आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉटसनने 14 अर्धशतके ठोकली आहेत, तर युवा फलंदाज संजू सॅमसनने 9 अर्धशतके ठोकली आहेत. राजस्थानला या विजयामुळे थोडा दिलासा मिळाला असला, तरी संघ अद्यापही अव्वल चारमध्ये नाही.
चेन्नईसाठी प्लेऑफची शर्यत झाली अवघड
चेन्नईसाठी प्ले ऑफची शर्यत अवघड बनली आहे. राजस्थानकडून झालेल्या पराभवानंतर चेन्नई गुणतालिकेत 8 व्या क्रमांकावर आहे. सीएसकेच्या पराभवाचा पंजाबला फायदा झाला आणि संघ सातव्या क्रमांकावर पोहोचला.
जोफ्रा आर्चरने केली उत्कृष्ट गोलंदाजी
राजस्थानचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या फेदक माऱ्यापुढे चेन्नईला 20 षटकांत केवळ 125 धावाच करता आल्या. आर्चरने 4 षटकांत 20 धावा देऊन 1 बळी घेतला, तर युवा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी, फिरकीपटू श्रेयस गोपाल आणि अष्टपैलू राहुल तेवतियाने प्रत्येकी 1 गडी बाद केले.
FIFTY!@josbuttler brings up a well made half-century. This is his 11th in IPL.#Dream11IPL pic.twitter.com/uxXirAYkMI
— IndianPremierLeague (@IPL) October 19, 2020
चेन्नईचे फलंदाज पुन्हा ठरले फ्लॉप
चेन्नईच्या कोणत्याही फलंदाजाला काही खास कामगिरी करता आली नाही. चेन्नईचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने 30 चेंडूत 35 धावा केल्या, तर कर्णधार एमएस धोनीने 28 चेंडूत 28 धावा केल्या. सीएसकेच्या फलंदाजांनी अतिशय संथ फलंदाजी केली, त्यामुळेच संघाला मोठी धावसंख्या गाठण्यात अपयश आले.
महत्त्वाच्या बातम्या-
-तो पहिलाच इंग्लिश मॅन.! आयपीएलमध्ये ‘ही’ कामगिरी फक्त जॉस बटलरने केलीये
-स्मिथ ऐवजी बटलर बनणार कर्णधार? राजस्थान रॉयल्सने दिलंय ‘हे’ उत्तर
-‘करो या मरो’ सामन्यात राजस्थानने रोखला चेन्नईचा विजयरथ, प्लेऑफच्या आशा पल्लवित
ट्रेंडिंग लेख-
-कधी खेळली गेली होती पहिली सुपर ओव्हर? घ्या जाणून
-आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’