---Advertisement---

अबब! 122 मीटर उंच कॅच जोस बटलरने पकडला, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद

On: गुरूवार, फेब्रुवारी 12, 2026 1:06 PM
---Advertisement---

इंग्लंडचा विकेटकिपर-फलंदाज जोस बटलर याने विश्वविक्रम केला आहे, ज्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. सर्वात उंच क्रिकेट चेंडू झेलण्याचा विक्रम बटलरने आपल्या नावे केला आहे. त्याचा हा पराक्रम इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन पाहतच राहिला. बटरलसाठी हे काही सोप काम नव्हते, त्यासाठी त्याने सुमारे एक तास आणि अनेक वेळा प्रयत्न करत पूर्ण केले.

बटलरने १२२ मीटर उंच ड्रोनमधून फेकलेला चेंडू झेलला, जो जमिनीपासून सुमारे ४०० फूट वर होता. आतापर्यंत कोणीही १२० मीटरच्या वर चेंडू झेलला नाही. केपटाऊनमध्ये बटलरने हा विक्रम केला. याआधी सर्वात उंच चेंडू झेलण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर टिमोथी शॅननच्या नावावर होता. त्याने २०२१मध्ये ११९. ८६ मीटर म्हणजे जमिनीपासून ३९३ लांब असलेला चेंडू झेलला होता.

बटलरला हा विक्रम करण्यासाठी एक तासाचा वेळ दिला होता. त्याने ५० मीटरपासून त्याची सुरूवात केली. पहिले काही प्रयत्न खूपच अपयशी ठरले. स्विच हिट यूट्युब चॅनलने हा व्हिडिओ शेयर केला आहे. बटलरची ही कामगिरी पाहता ‘विश्वचषक जिंकणे सोपे आहे’, असे पीटरसन म्हटला. त्यावेळी पीटरसनने हे पण म्हटले की अशी कामगिरी एमएस धोनी आणि ऍडम गिलक्रिस्ट यांनीही नाही केली. त्यानेही बटलरचा हा व्हिडिओ शेयर केला असून सध्या सुरू असलेल्या आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६च्या काळात हा चांगलाच व्हायरल होत आहे.

बटलरने ६० मिनिटांच्या काही शेवटच्या क्षणाला हा कॅच पकडला. आधी पिंक बॉल टाकला गेला, तो त्याला पकडता आला नाही. मग व्हाईट चेंडू फेकला गेला, ज्यामुळे तर अधिकच अडचण येत होती. पुन्हा तो रेड बॉलकडे वळाला आणि काही मिनिटांतच त्याने १२२ मीटर उंच असणारा चेंडू झेलला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---