रविवार दि. 24 जूनला झालेल्या एकदिवसीय मालिकेच्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेल्याचा पराभव करत इंग्लंडने 5-0 अशा फरकाने मालिका जिंकली.
इंग्लंड-ऑस्ट्रेलिया या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांच्या 140 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात इंंग्लडने ऑस्ट्रेलियाला प्रथमच एकदिवसीय मालिकेत 5-0 अशा फरकाने पराभूत केले.
पहिल्या चार सामन्यात पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलियाचा विजय इंग्लंडच्या जॉस बटलरने हिरावून घेतला.
प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने 34.4 षटकात सर्वबाद 205 धावा केल्या.
206 धावांचे आव्हान घेउन मैदानात उतरलेल्या इंग्लंडची सुरूवात अत्यंत खराब झाली. इंग्लंडने पहिल्या आठ षटकात 4 फलंदाज गमावून फक्त 24 धावा केल्या होत्या.
तर तीसाव्या षटकात इंग्लंडचे 124 धावांवर 8 गडी बाद करून ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याच्या दिशेने पहिले पाउल टाकले होते.
मात्र सध्या कारकिर्दीच्या पर्पल पॅचमध्ये असणाऱ्या जॉस बटललने ऑस्ट्रेलियाच्या हाता तोंडाशी आलेला विजय अदिल रशिदच्या साथीने अक्षरश: हिरावून घेतला.
सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या बटलरने आदिल रशिदला हाताशी घेत 9 व्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी करत इंग्लंडचा विजय निश्चित केला.
बटलरने 122 चेंडूत नाबाद 110 धावा केल्या यामध्ये 12 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता.
मार्च महिन्यातील बॉल टेंम्परींग प्रकरण, वार्नर-स्मिथ यांच्यावरील बदी आणि आता इंग्लंड विरुद्धच्या व्हाइट वॉशमुळे ऑस्ट्रेलिय संघावर इतिहासात प्रथमच इतकी वाईट वेळ आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-टेन्शनमध्ये असलेल्या केएल राहुलला विराट-अनुष्काने केली अशी मदत!






