---Advertisement---

‘जोस द बॉस’चा पहिल्याच सामन्यात राडा, वादळी अर्धशतकासह पाडला विक्रमांचा पाऊस

Jos-Buttler
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2022चा हंगाम गाजवणारा राजस्थान रॉयल्स संघाचा विस्फोटक फलंदाज जोस बटलर आयपीएल 2023 स्पर्धेतही धमाल करतोय. रविवारी (दि. 2 एप्रिल) सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात बटलरने वादळी फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. या अर्धशतकानंतर त्याच्या नावावर खास विक्रम नोंदवले गेले. एका विक्रमात त्याने केएल राहुल आणि सुनील नारायण या खेळाडूंनाही मागे टाकले.

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals) संघात रंगलेल्या या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकली. यावेळी कर्णधार भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याने गोलंदाजीचा निर्णय घेत राजस्थान रॉल्स संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. राजस्थानकडून डावाची सुरुवात करण्यासाठी जोस बटलर (Jos Buttler) आणि यशस्वी जयसवाल मैदानात उतरले होते. यावेळी दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी झाली. यामध्ये बटलरच्या अर्धशतकाचा समावेश होता.

https://twitter.com/IPL/status/1642483190513405953

बटलरने यादरम्यान अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक झळकावले. पुढे तो आणखी दोन चेंडू खेळून 5.5 षटकात फजलहक फारुकीच्या चेंडूवर बाद झाला. यावेळी बटलरने सामन्यात 22 चेंडूत 3 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 54 धावा केल्या. या धावा त्याने 245.45च्या स्ट्राईक रेटने चोपल्या. या अर्धशतकामुळे त्याच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला.

https://twitter.com/IPL/status/1642474690852827137

जोस बटलरचा विक्रम
पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत बटलर दुसऱ्या स्थानी विराजमान झाला. बटलरने 3 वेळा पॉवरप्सेमध्ये सर्वाधिक वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या. या यादीत अव्वलस्थानी डेविड वॉर्नर असून त्याने 6 वेळा अशी कामगिरी केली आहे. बटलरसह दुसऱ्या स्थानी संयुक्तरीत्या ख्रिस गेल असून त्यानेही 3 वेळा ही कामगिरी केली आहे. याव्यतिरिक्त संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी केएल राहुल आणि सुनील नारायण आहेत. त्यांनीही पॉवरप्लेमध्ये 2 वेळा 50 हून अधिक धावा केल्या आहेत.

आयपीएलमध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारे फलंदाज
6 – डेविड वॉर्नर
3 – जोस बटलर*
3 – ख्रिस गेल
2 – केएल राहुल
2 – सुनील नारायण

बटलरचा खास कारनामा
याव्यतिरिक्त जोस बटलरने आणखी एक खास कारनामा केला. त्याने खेळलेल्या आयपीएलच्या मागील 19 डावांमध्ये 5 शतके आणि 5 अर्धशतकांचा पाऊस पाडला आहे. (jos buttler creates record after hit fifty against srh in ipl 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सराव सामन्यात धोनीने ठोकला गगनचुंबी षटकार, पाहून सर्वांना झाली 2011 वर्ल्डकपची आठवण, पाहा व्हिडिओ
बापरे! 2011 विश्वविजेत्या संघातील 16 पैकी केवळ दोन जण आजही खेळताय टीम इंडियाकडून क्रिकेट 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---