---Advertisement---

आयपीएलमधील ४ संघांचे कर्णधार यष्टीरक्षक असल्याचे श्रेय बटलरने दिले एमएस धोनीला, म्हणाला…

On: रविवार, एप्रिल 11, 2021 10:15 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ हंगामातील सामन्यांना गुरुवार दिनांक ९ एप्रिल पासून सुरुवात झाली. आयपीएलमधील या वेळेसची उल्लेखनीय बाब म्हणजे ४ संघांच्या नेतृत्वाच्या धुरा यष्टीरक्षकांच्या हातात आहेत. याबद्दल बोलताना राजस्थान रॉयल्सचा स्टार फलंदाज आणि यष्टीरक्षक जोश बटलरने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला श्रेय दिले आहे.

सध्या चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार धोनी, दिल्ली कॅपिटल्सचा रिषभ पंत, पंजाब किंग्सचा कर्णधाक केएल राहुल आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन हे सर्वजण यष्टीरक्षक फलंदाज आहेत.

याबद्दल बटलर म्हणाला की, ‘मला खात्री आहे की धोनीच्या सहावे इंद्रियाचा आणि यष्टीरक्षक कर्णधार म्हणून तयार होण्याचा काहीतरी संबंध आहे. धोनी हा शानदार कर्णधार होता. असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांना त्याच्या पावलावर पाऊल ठेवायचे आहे.’

पुढे बटलर एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाला, ‘मला वाटते की यष्टीरक्षक यष्टीमागे उभे राहून खेळाला चांगल्याप्रकारे समजू शकतात. यष्टीमागे उभे राहिल्याने गोलंदाज कशाप्रकारे गोलंदाजी करत आहे आणि खेळपट्टी कशी आहे हे समजत असल्याने निर्णय घेण्यास मदत होते.’

तसेच राजस्थान रॉयल्सनेही यंदा संजू सॅमसनकडे कर्णधारपद सोपवले आहे. याबद्दल बोलताना बटलर म्हणाला, ‘आमच्याकडे या हंगामासाठी विविधता आहे. संघात बेन स्टोक्स, ख्रिस मॉरीस सारखे अष्टपैलू आहेत आणि नवीन कर्णधारही आहे. संजू हा खूप चांगला खेळाडू आहे आणि राजस्थानशी दिर्घकाळापासून जोडलेला आहे. तो शांत खेळाडू आहे आणि त्याला मजा घ्यायला आवडते. मला खात्री आहे की तो चांगले प्रयत्न करुन संघाला पुढे नेईल. त्याच्या नेतृत्वात जिद्द आहे.’

राजस्थान रॉयल्सला आयपीएल २०२१ हंगामातील पहिला सामना पंजाब किंग्सविरुद्ध १२ एप्रिलला वानखेडे स्टेडियमवर खेळायचा आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

राणाजी रॉक्स! रोहित आणि वॉटसननंतर अशी कामगिरी करणारा बनला केवळ तिसरा फलंदाज

एमएस धोनी यंदा खेळतोय अखेरची आयपीएल? ‘या’ गोष्टीमुळे मिळत आहेत संकेत

हे आहेत सनरायझर्सचे ‘जबरा फॅन’, वॉर्नरने शेअर केली छायाचित्रे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---